जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील…ते अतिक्रमण अखेर भुईसपाट,सर्वत्र ग्रामस्थांचा आक्रोश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान गट क्रमांक,४४७ व ४४८ मधील जवळपास १३३ अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश पारित केला होता त्याची अंमलबजावणी शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केली असून काल दिवसभरात ही अतिक्रमणे हटविली असून आजही ही मोहीम सुरू असल्याने येथील ग्रामस्थ आता थेट रस्त्यावर आले असून अनेकांनी मंदिरे व आपल्या आप्तस्वकीयांकडे आश्रय घेतल्याचे चित्र आहे.

छायाचित्रात भुईसपाट धोंडेवाडी गाव दिसत आहे.

दरम्यान रामनाथ भालेराव यांनी तर आपल्याला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एक आर जमीन अधिवासासाठी दिला असल्याचा दावा केला असून त्यांच्या महिलांचा आक्रोश हृदयाचा ठाव घेणारा ठरला आहे.मात्र हा आक्रोश ऐकायला संबंधित यंत्रणेला कान होतेच कुठे.असाच आक्रोश सर्वत्र आढळून आला आहे.या अतिक्रमण हटाव मोहिमेचा दूरगामी परिणाम होणार असून अनेकांनी आम्हा गरिबांची अतिक्रमणे हटवली आहे मात्र हेच प्रशासन आताउच्च न्यायालयाचे आदेशाने कोपरगाव शहरातील बड्या नेत्यांचे साईबाबा चौकातील ५१ एकरांतील अतिक्रमण याच जोशात हटवणार का ? असा रास्त सवाल विचारला आहे.याचीच तालुक्यात सर्वत्र चर्चा झडत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण अठरा कि.मी.अंतरावर जवळके ग्रामपंचायत हद्दी जवळच धोंडेवाडी हि ग्रामपंचायत सन १९८० साली स्थापन झाली आहे.पूर्वी हे गाव वेस ग्रामपंचायतीचा भाग म्हणजेच वाडी होती.मात्र लोकसंख्या वाढल्यावर हि स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली आहे.पूर्वी पासून या गावठाणा शेजारी दक्षिण बाजूस गायरान आहे.त्याचा ग.क्रं.४४७ व ४४८ असा आहे.त्या जागेवर पुर्वांपार अनेक ग्रामस्थानीं गावठाण कमी पडत असल्याने व कुटुंब वाढल्याने शेजारीच असलेल्या गायरान जमिनीत अतिक्रमण करून त्या जागी कच्ची-पक्की घरे बांधलेली आहे.त्यात ते अनेक दशकापासून राहत होते.तथापि पाच-सात वर्षांपूर्वी या गावातील रांजणगाव प्रादेशिक नळ पाणी योजनेचे व उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी तेथील पाझर तलावात पडत होते.त्यातून अनेकांना त्या ठिकाणी अवैध विहिरी खोदण्याचा मोह निर्माण झाला.त्या विहिरींचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळू लागला.मात्र त्यातील काहींना या विहिरीचे पाणी मिळत असल्याने त्यांनी रांजणगाव देशमुखसह सहा गावांना दुष्काळात पाणी पुरेनासे झाले होते.त्यातून अनेकांनी टँकर मधून लाखो रुपयांची माया गोळा केली होती.त्यावरून या विहिरी बुजविण्यासाठी दूसरा गट रीतसर सरकार दरबारी भांडू लागला होता.त्यावरून स्वाभाविकपणे गावात विहिरी बुजविण्यावरून दोन तट पडले.त्यासाठी एका गटाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करून त्या अनधिकृत विहिरी बुजविण्यास अहंम भूमिका निभावली.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत.

त्यावरून ज्यांच्या विहिरी बुजवल्या गेल्या तो गट दुखावला गेला होता.मग त्यांनी दुसऱ्या गटाची जिरविण्यासाठी गावात मोठ्या संख्येने अवैधपणे राहणारा दुसरा गटाला जबाबदार धरून ते ज्या जागेत बेकायदा वस्ती करून राहत होते.त्यावर हरकत घेतली.व त्यातून प्रशासनाने ज्या वेळी गायरान ग.क्रं.४४७ व ४४८ मधील अतिक्रमण करून राहणाऱ्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यास असमर्थता दर्शवली त्या वेळी दुसऱ्या गटाने याबाबत उच्च न्यायालय मुंबईचे खण्डपीठ औरंगाबाद येथे दावा दाखल केला होता.त्याचा निकाल हे गायरानातील अतिक्रमण काढण्यासाठी दि.२९ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश झाला होता.त्या नंतर तेथे राहणाऱ्या ग्रामस्थांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.त्या बाबत सुनावणी होऊन त्या न्यायालयाने दि.१७ डिसेंबर रोजी आदेश पारित करून सदरचे ग.क्रं.४४८ मधील अतिक्रमण काढण्याबाबत उच्च न्यायालय औरंगाबाद यांचा आदेश कायम केला आहे.त्यानुसार कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी त्या बाबत जा.क्रं.ग्रा.पं.२/१२०४/२०२१ अन्वये दि.२४ एप्रिल रोजी हे अतिक्रमण पाडण्याबाबत आदेश पारित केला आहे.त्यानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याच्या नोटिसा बजावल्या होत्या.त्यानुसार अतिक्रमण धारकांना हे आदेश धोंडेवाडी ग्रापंचायतीने नुकतेच दिले होते.

त्या नुसार हि कार्यवाही करण्यात आली आहे.त्यासाठी या अतिक्रमण धारकांना अंतिम मुदत दि.०३ जानेवारी २०२२ रोजी दिलेली होती.व त्या पूर्वी स्वतःहून हे अतिक्रमण त्यांनी काढून घेणे गरजेचे असल्याने अनेकांनी शासकीय दहशतीने शासकीय यंत्रणा येण्याच्या आधीच जवळपास सत्तर ते ८० टक्के काढून घेतले होते.केवळ तीस टक्के पक्की घरे बाकी राहिली होती.ती काढण्यासाठी काल सकाळी साडे सात वाजेच्या आत जे.सी.बी.च्या साहाय्याने हे अतिक्रमण हटवले गेले असून ही मोहीम सायंकाळी सहा वाजे पर्यंत सुरू होती तर आजही ती सुरू आहे.यात शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे,कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आदी प्रमुख मान्यवरांसह शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदींसह मोठा पोलिसांचा फौंज फाटा उपस्थित होत.

दरम्यान ही मोहीम राबवताना कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.तथापि कृष्णा रामनाथ भालेराव या तरुणाने हनुमान मंदिरावर जाऊन आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.तर श्रीमती प्रमिला आत्याभाऊ नेहे या महिलेने अतिक्रमण हटवताना समोर हटवादीपणा केला मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना बाजूस करण्यास यश मिळवले तर दुसऱ्या एका नेहे कुटुंबातील तरुण धनंजय शिवाजी नेहे,महेंद्र नेहे या भावंडांनी आपला राग प्रस्थापित राजकीय नेत्याविरुद्ध स्थानिक वाहिणीशी बोलताना व्यक्त केला आहे.मात्र त्याचा संताप मात्र राजकीय दबावातून सामाजिक संकेत स्थळावरून नंतर हटवला गेला असून राजकीय मुस्कटदाबी केली असल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान रामनाथ भालेराव,चंद्रकला भालेराव यां पती-पत्नीने तर आपल्याला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एक आर जमीन अधिवासासाठी दिला असल्याचा दावा केला असून त्यांच्या महिलांचा आक्रोश हृदयाचा ठाव घेणारा ठरला आहे.मात्र हा आक्रोश ऐकायला संबंधित यंत्रणेला कान होतेच कुठे.असाच आक्रोश सर्वत्र आढळून आला आहे.

या अतिक्रमण हटाव मोहिमेचा दूरगामी परिणाम होणार असून अनेकांनी आम्हा गरिबांची अतिक्रमणे हटवली आहे मात्र हेच प्रशासन आता कोपरगाव शहरातील बड्या नेत्यांचे ५१ एकरांतील अतिक्रमण याच जोशात हटवणार का ? असा रास्त सवाल विचारला आहे.याचीच तालुक्यात सर्वत्र चर्चा झडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close