गुन्हे विषयक
कासलीत जमिनीच्या कारणावरून मारहाण,आठ जणांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कासली ग्रामपंचायत हद्दीत गट क्रं.१३९ मध्ये फिर्यादी हे हरभरा खुरपणीचे काम करीत असताना जमिनीच्या हक्काचे कारणावरून आरोपी नानासाहेब काशिनाथ मलिक व अन्य सात सहकाऱ्यांनी हातातील काठीने मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद ओंकार विठ्ल मलिक यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी ओंकार मलिक व आरोपी नानासाहेब मलिक यांचा कासली ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रं.१३९ मधील क्षेत्रामुळे वाद आहे.त्या शेतात फिर्यादी ओंकार मलिक व त्यांचा भाउ श्रावण विठ्ल मलिक व वडील विठ्ल पंढरीनाथ मलिक हे शेतातील हरभरा खुरपणीचे काम करता असताना त्या ठिकाणी आरोपी नानासाहेब काशिनाथ मलिक यांनी आपल्या अन्य सात सहकाऱ्यांना विहीर पाण्याच्या कारणावरून काठीने हल्ला चढवला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी ओंकार मलिक व आरोपी नानासाहेब मलिक यांचा कासली ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रं.१३९ मधील क्षेत्रामुळे वाद आहे.त्या शेतात फिर्यादी ओंकार मलिक व त्यांचा भाउ श्रावण विठ्ल मलिक व वडील विठ्ल पंढरीनाथ मलिक हे शेतातील हरभरा खुरपणीचे काम करता असताना त्या ठिकाणी आरोपी नानासाहेब काशिनाथ मलिक,दिनेश नानासाहेब मलिक,पवन नानासाहेब मलिक,काशिनाथ किसन मलिक,हिरामण रमेश मलिक,वसंत त्रिंबक भगुरे सर्व राहणार कासली,व वाल्मीक सर्जेराव शिंदे रा. पढेगाव,नानासाहेब काशिनाथ मलिक यांचा सासरा नाव माहित नाही नाव माहीत नाही राहणार धामोडे तालुका येवला जिल्हा नाशिक आदींनी फिर्यादी ओंकार विठ्ठल मलिक (वय-३६) व त्याचा भाऊ श्रावण विठ्ल मलिक व वडील विठ्ठल पंढरीनाथ मलिक आदींना काठीने व लाथा बुक्यांनी डोक्यात,पाठीवर,पोटावर,छातीवर मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.फिर्यादी ओंकार मलिक याने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५०/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,४४७ प्रमाणे वरील आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.