जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

धोत्रे गावात गणेश मंदिरावर ज्ञात इसमांनी केली दगडफेक!

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाब तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील गणेश मंदिरावर अज्ञात इसमांनी दगडांनी हल्ला केल्याने गावातील एकोपा भंग पावण्याची भीती व्यक्त होत असून कोपरगाव तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांची उशिरा बैठक घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त प्राप्त झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या घटनेला पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

नगर जिल्ह्यात राम मंदिराचे विश्वस्त ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास राम भक्त व सेवक यांनी याच गणेश मंदिरात ग्रामस्थांची बैठक घेऊन सुमारे सहा लाखांच्या निधीचे संकलन केले आहे.ही बैठक संपन्न झाल्या नंतर सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास गणेश मंदिर परिसरात कोणी नाही ही संधी साधत काही समाज कंटकांनी या मंदिरात दगडफेक केली आहे.

कोपरगाव तालुक्यात वर्तमानात राम मंदिरासाठी लोक वर्गणी संकलित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.हा निधी दीड महिन्यात संकलन करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभ हस्ते करण्यात आला असून नगर जिल्ह्यात राम मंदिराचे विश्वस्त ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास राम भक्त व सेवक यांनी घोत्रे येथील सुमारे चार हजार लोकसंख्येच्या गावात याच गणेश मंदिरात ग्रामस्थांची बैठक घेऊन सुमारे सहा लाखांच्या निधीचे संकलन केले आहे.या ठिकाणी मस्जिद व मंदिर शेजारी-शेजारीच आहे.हे मंदिर साधारण तीस बाय पस्तीस फूट आकारात असून पुढे आ.काळे यांनी आपल्या निधीतून सभामंडप बांधून दिलेला आहे.ही निधी संकलनाची बैठक संपन्न झाल्या नंतर सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास गणेश मंदिर परिसरात कोणी नाही ही संधी साधत काही समाज कंटकांनी या मंदिरात दगडफेक केली त्यात मंदिराच्या काचा फुटल्या असून खिडक्या,गाभारा यांना क्षती पोहचवली असल्याचे वृत्त आहे.मंदिरातही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याचें प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.परिणामस्वरूप ही घटनां परिसरात सामाजिक संकेत स्थळावरून वाऱ्यासारखी पसरली व परिणामस्वरूप ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व एक छोटेखानी बैठक घेऊन या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला असून आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान या घटनेची खबर कोपरगाव तालुका पोलिसांना लागली घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेऊन तेथील गावातील जाणत्या नागरिकाची,जेष्ठ ग्रामस्थांची तातडीची बैठक घडवून आणली असून या असामाजिक तत्वांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.गावात तणावपूर्ण शांतता आहे.काही तरुणांनी गुन्हेगारांना जो पर्यंत पोलीस पकडत नाही तो पर्यंत आपण ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतली असल्याचे समजते.या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान याच गावात हिंदू-मुस्लिम समाज अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने रहात असताना या गावाला साडेसाती लागल्याचे दिसत आहे.पोलीस निरीक्षकपदी अनिल कटके असताना काही महिन्यांपूर्वी काही नागरिकांनी एका महापुरुषांचा पुतळा रातोरात बसवून प्रशासनासमोर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला होता मात्र त्या ठिकाणी दिवसभर पोलीस निरीक्षक कटके यांनी बैठका घेऊन या बेशिस्त नागरिकांचे समुपदेशन करून तो पुतळा हटविण्यास भाग पाडले होते त्या नंतर ही काही महिन्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत असून येथे पोलिसांना अधिकचे लक्ष पुरविण्याची जबाबदारी येऊन पडली असल्याचे दिसत असून या असामाजिक तत्वांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close