जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

परकीय चलन वाचविण्यासाठी इंधन बचत गरजेची-चौधरी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

इंधन बचत ही काळाची गरज आहे परकीय चलन वाचविण्यासाठी आपल्याला बचत हा जवळचा मार्ग आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विशेषतः बस व वाहन चालकांनी बचत करण्यासाठी जाणीवपूर्वक उपाययोजना कराव्या असे आवाहन कोपरगाव येथील राज्यपरिवहन आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांनी केले आहे.

गाडीच्या इंजिनाला खूप काम करावं लागतं.त्यानं इंधन खूप वारलं जातं.इंधनाचा नेमका उपयोग व्हावा,यासाठी एअर फिल्टर वेळोवेळी बदला.नको त्या गोष्टी गाडीतून कमी करा.त्यामुळे गाडीचं वजन कमी होऊन इंधन बचत होईल.टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात ठेवल्यानं टायरची कमीतकमी झीज होईल.पर्यायानं इंधनाचा वापरही कमी होईल.इंधन बचत ही काळाची गरज आहे-अभिजित चौधरी,आगार व्यवस्थापक कोपरगाव.

राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात आज सकाळी इंधन बचत सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून त्या निमित्त आगार प्रमुख अभिजित चौधरी हे उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

सदर प्रसंगी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,बस आगाराच्या लेखापाल सुनीता गवळी,प्रभारक सोनाली संगमकर आदी मान्यवरांसह बहुसंख्य बस चालक,वाहक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”इंधन जर संपले किंवा जर आपण त्याचा वापर योग्य रीतीने केला नाही तर इंधनाशिवाय जगणे खूप अशक्य आहे.आपण जर कल्पना केली की एक दिवस इंधन नसेल तर प्रथम सकाळी उठल्यानंतर अंघोळीचे पाणी तापवण्याचा प्रश्न,स्वयंपाक कसा करणार,त्यानंतर शाळेत किंवा कामावर कसे जाणार जर दळणवळणासाठी इंधनच नसेल तर सर्व जग त ठप्प होऊन जाईल.त्यामुळे जे इंधन आहे ते जास्तकाळ वापरणे हे आपल्या हिताचे आहे.अद्याप अपारंपरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले नाही.त्यामुळे आहे ती ऊर्जा व इंधन जास्त काळ पुविण्याचे मोठे आव्हान आपल्या पुढे आहे.आज देश इंधन आयातीसाठी साडेसात लाख कोटींचा खर्च करत असून हि रक्कम फार मोठी आहे.हि परकीय गंगाजळी आपल्याला वाचावयाचे असेल तर इंधन बचत व जैविक इंधन व पर्यायी इंधनाचा उपयोग करावा लागेल.त्यातून परकीय चलन वाचले जाईल व ते रोजगार निर्मितीसाठी वापरता येईल त्यामुळे याबाबत वाहन चालकांनी देश समृद्ध करण्यासाठी सर्व प्रथम पुढे येऊन विविध उपाय योजना करून इंधन बचत करण्यास या निमित्ताने सुरुवात करून राज्यापुढे आपल्या आगाराचा एक आदर्श निर्माण करावा.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”इंधन टँकचं झाकण घट्ट लावलेलं नसेल,तरीही तुमची गाडी अपेक्षित मायलेज देणार नाही. झाकण घट्ट लावलं नसेल तर गाडीतले इंधन लीक होऊ शकतो.याचसाठी टाकीचे झाकण घट्ट लावल्याची खात्री करून घ्या.गाडी कुठल्याही कारणानं जागीच उभी असेल,तर ती बंद ठेवा.चालू ठेवू नका.त्यामुळेही इंधनाची बचत होईल.बसच्या अॅक्सलरेटर पॅडेलवर सातत्यानं पण हळूहळू दाब द्या.कारची गती सावकाश वाढवा.विशिष्ट वेगमर्यादेतच गाडी चालवा.त्यामुळे इंधन बचत होईल.सतत गती वाढवून आणि ब्रेक दाबून इंधनाचा वापर जास्त होतो.म्हणून आवश्यक असेल,तेव्हाच वाहनाचा वेग वाढवा.गाडी चालवताना खिडक्या बंद ठेवा.त्याने वाऱ्याचा वेग कमी होऊन इंधन बचत होईल.उन्हाळ्यात गाडीतील वातानुकुलित यंत्रणेचा वापर वाढतो.त्यावर नियंत्रण ठेवलं,तरीही इंधन वाचेल.गाडीचे एअर फिल्टर खराब झाले असतील, तर गाडीच्या इंजिनाला खूप काम करावं लागतं.त्यानं इंधन खूप वारलं जातं.इंधनाचा नेमका उपयोग व्हावा,यासाठी एअर फिल्टर वेळोवेळी बदला.नको त्या गोष्टी गाडीतून कमी करा.त्यामुळे गाडीचं वजन कमी होऊन इंधन बचत होईल.टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात ठेवल्यानं टायरची कमीतकमी झीज होईल.पर्यायानं इंधनाचा वापरही कमी होईल.इंधन बचत ही काळाची गरज आहे परकीय चलन वाचविण्यासाठी आपल्याला बचत हा जवळचा मार्ग आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विशेषतः वाहन चालकांनी बचत करण्यासाठी जाणीवपूर्वक उपाययोजना कराव्या असे आवाहन कोपरगाव येथील राज्यपरिवहन आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांनी शेवटी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र जाधव यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांनी केले आहे.उपस्थितांचे आभार सोनाली संगमकर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close