जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावकरांनी कोरोनाबाबत निष्काळजी पणा टाळावा-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका व शहरातील बहुतांशी नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळणे सोडून तोंडावरच्या मुखपट्ट्या काढून टाकल्यामुळे मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.कोरोना बाधित रुग्णांची वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय असून नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका बैठकीत केले आहे.

राज्यात साधारण वर्षभरापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.साधारण वर्षभराच्या नियम आणि निर्बंधांनंतर राज्यात अखेर अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली.टप्प्याटप्प्यानं देण्यात आलेल्या या शिथिलतेमध्ये समावेश होता दुकानांच्या वेळा,उपहारगृह सुरु करण्याची मुभा आणि अखेर निर्धारित वेळांमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकलच्या प्रवासाची मुभा.तिथं लोकल सेवा सुरु करण्याबाबतचा निर्णय ठाकरे सरकारनं दिला आणि इथं अनेक कार्यालयं पुन्हा सुरु करण्यात आली.मात्र त्याचा नागरिकांनी वेगळा अर्थ घेतला परिणाम आज कोरोना रुग्णांत मोठ्या संखने वाढ सुरु झाली असून या पार्श्वभूमीवर आज सकाळी आ.काळे यांनी तातडीने बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे,कारभारी आगवन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,युवकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,मधुकर टेके,श्रावण आसने,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,महेमूद सय्यद, डॉ.अजय गर्जे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,व्यापारी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधीर डागा,भरत मोरे, दिनकर खरे,रमेश गवळी,डॉ.तुषार गलांडे,रोहिदास होन,राहुल जगधने,विनायक गायकवाड,आकाश डागा,पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,प्रभारी ग्रामीण अधीक्षक डॉ.विजय गणबोटे,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी,पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे,भूमी अभिलेख अधीक्षक संजय भास्कर,गटविस्तार अधिकारी डी.ओ.रानमाळ,नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णी,श्रीमती एम. एस.गोरे,अव्वल कारकून आर.एफ.चौरे,श्रीमती एस.पी.शिंदे,आर.एस. शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले की,”मागील माहिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती.तसेच देशात,राज्यात,जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण देखील सुरु करण्यात आल्यामुळे कोरोना आजाराच्या बाबतीत नागरिकांमधील भीतीचे वातावरण काहीसे कमी होवून कोरोना संपल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचा नागरिकांना विसर पडला होता.त्यामुळे चेहऱ्याला मास्क, सामाजिक अंतर व साबण,प्रतिबंधक औषधें आदींनी आपले हात वारंवार धुण्याचा देखील नागरिकांना विसर पडला होता. त्या निष्काळजीपणामुळे रोडावलेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी यापुढे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.यापुढे लॉकडाऊन करणे परवडणारे नाही त्याचे दूरगामी परिणाम होवून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम होतात.त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेवून कोरोना बाधित रुग्ण वाढणार नाही यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.यापूर्वी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य नागरिकांच्या जास्तीत जास्त तपासण्या कराव्या.कोविड केअर सेंटर सुरु करणे,कोरोना बाधित रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात उपचार उपलब्ध करून देणे त्याप्रमाणे नागरिकांचे आरोग्य बाधित राहण्यासाठी परिस्थितीनुसार प्रशासन जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही आ.काळे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close