गुन्हे विषयक
कोपरगावात पुन्हा दुचाकीची चोरी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील खंडोबा मंदिरासमोर मोहिनीराजनगर येथील रहिवाशी असलेले फिर्यादी राहुल नामदेव धुमाळ (वय-२०) या मजुरी करणाऱ्या नागरिकांची सुमारे ४५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची चंदेरी पट्टे असलेली दुचाकी (क्रं.एम.एच.१७ सी.के.९४५६) हि अज्ञात चोरट्याने घरासमोर उभी केली असता दि.२९ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेनंतर व सकाळी सहा वाजेच्या आत चोरून नेली आहे.त्यामुळे दुचाकी स्वारात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी राहुल धुमाळ यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,चोरी गेलेली दुचाकी हि आपल्या आजोबांच्या नावावर आहे.ती पण वरील तारखेस व वेळी आपल्या घरासमोर मुख्य कुलूप लावून उभी करून ठेवली असता रात्री अज्ञात चोरट्याने तिच्यावर पाळत ठेऊन चोरून,लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेली आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आपल्या दप्तरी गु.क्रं.१६-२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.