पुरस्कार,गौरव
छायाचित्रकार भवर यांना गौरव पुरस्कार जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त श्रीरामपूर येथील शब्दगंध साहित्यिक परिषद लोकरंग बहुउद्देशीय संस्था वडाळा महादेव करिअर काॅमपुटर यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असून यात कोपरगाव येथील छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोपरगाव येथील छायाचित्रकार,साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी आजतागायत राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगाव साहित्यिक मंडळ व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
श्रीरामपूर येथील शब्दगंध साहित्यिक परिषद लोकरंग बहुउद्देशीय संस्था,वडाळा महादेव करिअर काॅमपुटर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या कार्यक्रम जेष्ठ साहित्यिक आ.लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली व लक्ष्मणराव निकम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास कडूभाऊ काळे,डॉ.रविंद्र कुटे,सुनील गोसावी,वंदनाताई मुरकुटे,शर्मीलाताई गोसावी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भवर यांचे सोबतच हे पुरस्कार शेख मिराबक्ष बागवान,शेख रफीक,आनंदा साळवे यांनाही जाहीर केले आहेत.जिल्ह्यातील अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे
छायाचित्रकार,साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी आजतागायत राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगाव साहित्यिक मंडळ व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.