जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहराच्या मध्यवस्तीत गोवंश कत्तल,२.३६ लाखांचा ऐवज जप्त

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या मध्य वस्तीतील आयेशा कॉलनीत काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी याना एका गुप्त खबऱ्या मार्फ़त मिळालेल्या खबरी वरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत टाकलेल्या धाडीत १४ जर्शी गायी तर दोन गावरान गायी असा १६ गायी व त्यांची सुरु असलेली कत्तल त्यांचे गोमांस असा २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज मिळून आला असून त्या ठिकाणी आरोपी वसीम फारूक कुरेशी (वय-२०),अक्रम फकीर कुरेशी (वय-२७),खालील जमाल कुरेशी(वय-३६) सर्व रा.आयेशा कॉलनी संजयनगर कोपरगाव आदींना रंगेहात जेरबंद केल्याचा गुन्हा रात्री उशिरा दाखल झाल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दोन वर्षांपूर्वी कोपरगावात याच परिसरात ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी नगर पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेऊन धाड टाकली होती.त्यावेळीही असाच मोठ्या प्रमाणावर गोवंश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गायी व गोमांस आढळून आले होते.व हे गोमांस थेट संगमनेर मार्गे गुजरात राज्यात सुद्धा जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली होती.व संगमनेर येथील व्यापारी हे हि गोवंश कत्तल या ठिकाणाहून करून ती बाहेर पाठवत असल्याचे निष्पन्न झाले होते.

भारतात गाय,बैल,म्हैस,शेळी,मेंढी हे प्राणी तर कुटुंबव्यवस्थेला जगण्यासाठी आर्थिक हातभार लावणारे पाळीव प्राणी आहेत.त्यांना उपयुक्त प्राणी म्हटले जाते. गाईचे देखणेपण काही वेगळेच असते.बैल एके काळी व आजही काही प्रमाणात शेतीसाठी उपयुक्त व महत्त्वाचा प्राणी मानला जातो.दारात गाय,म्हैस किंवा अगदी शेळी तरी असणे हे त्या कुटुंबाच्या भरलेपणाचे लक्षण मानले जाते.बैलजोडी दारात असणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते.शेतकरी पोटच्या मुलाइतकेच गोठय़ातल्या जनावरांना जपतो.ही भारतीय समाजाची प्राण्यांवर प्रेम करण्याची मानसिकता आहे,परंपरा आहे.त्यातूनच भाजप सरकारने राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा मंजूर करून घेतला होता.मात्र त्याची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात होत नाही.दोन वर्षांपूर्वी कोपरगावात याच परिसरात ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी नगर पोलिसांनी तीन दिवस पाळत ठेऊन धाड टाकली होती.त्यावेळीही असाच मोठ्या प्रमाणावर गोवंश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गायी व गोमांस आढळून आले होते.व हे गोमांस थेट संगमनेर मार्गे गुजरात राज्यात सुद्धा जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली होती.व संगमनेर येथील व्यापारी हे हि गोवंश कत्तल या ठिकाणाहून करून ती बाहेर पाठवत असल्याचे निष्पन्न झाले होते.त्यानंतर रात्री केली गेलेली कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे.
काल सांयकाळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यांनी त्याबाबत सतर्क होऊन आपल्या सहकाऱ्यांना सतर्क करून तातडीने हालचाल करून कारवाई केली असता संजयनगर आयेशा कॉलनी या ठिकाणी काटवनात आडोशाला हा मोठा उद्योग निदर्शनात आला आहे.त्यात विविध किमती असलेल्या चौदा जर्शी गायी व दोन गावरान गायी असा मोठा ऐवज त्यांच्या हाती लागला आहे.पोलिसांनी रात्रीच त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी श्रद्धा काटे यांना पाचारण करून जागेवरच पंचनामा करून ऐवज जप्त केला आहे.व सदरची भाकड जनावरे कोकमठाण येथील गोशाळेत रवाना केले आहे.तर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने गोवंश कात्तल केलेले गोमांस नष्ट केले आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.अन्वये भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१),(ह)व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम क्रं.१९९५ चे कलम ५ (ब) ९ ,भा.द.वि.कलम ४२९ प्रमाणे वरील तिन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.व त्यांना अटक केली आहे.या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड,पो.कॉ.खारतोडे,संभाजी शिंदे,श्री कुंडारे,आदींनी मोलाची भूमिका निभावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close