गुन्हे विषयक
कोपरगाव नजीक एकाचा अकस्मात मृत्यू
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या ईशानेंन्स साधारण तीन की.मी.अंतरावर असलेल्या कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस खिर्डी गणेश रस्त्यालगत व रेल्वे रुळाच्या नजीक एक इसम ( वय अंदाजे पन्नास ) आज दुपारी एक वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आल्याने नजीकच्या ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव रेल्वे स्थानका नजीक काही ग्रामस्थांनी अमित खोकले यांना खिर्डी गणेश रस्त्यावर रेल्वे रुळाच्या भराव्याच्या खाली एक निळी जीन्स पॅन्ट व वर काळ्या रंगाचे जर्किंन घातलेला एक मध्यम वयींन इसम (वय-५०) मृत अवस्थेत असल्याची खबर दिली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी याची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव येथील रुग्णवाहीनीचे चालक अमित खोकले हे आपली गाडी घेऊन आपल्या नातेवाईकाडे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास खिर्डी गणेशकडे जात असताना कोपरगाव रेल्वे स्थानका नजीक काही ग्रामस्थांनी त्यांना खिर्डी गणेश रस्त्यावर रेल्वे रुळाच्या भराव्याच्या खाली एक निळी जीन्स पॅन्ट व वर काळ्या रंगाचे जर्किंन घातलेला एक मध्यम वयींन इसम (वय-५०) मृत अवस्थेत असल्याची खबर दिली.त्यावेळी रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांनी त्या घटनास्थळी धाव घेतली व त्या इसमास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तातडीने भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.
याबाबत अमित खोकले यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या घटनेची खबर केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगावचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्री दारकुंडे हे करीत आहे.या घटनेने शिंगणापूर,खिर्डिंगणेश परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.मृत व्यक्तीची ओळख पटण्यासाठी एकही खूण सापडली नाही.त्यामुळे या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान कोपरगाव शहर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.