गुन्हे विषयक
कोपरगावात मनसेच्या कार्यकर्त्यावर चोरीचा गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जागेत आरोपी अलीम छोटु शहा,संगीता अरुण पंडोरे,अरुण मन्साराम पंडोरे सर्व रा.कोपरगाव आदींनी खाजगी जागेत अतिक्रमण करून तेथील पत्रे काही चीजवस्तू लंपास केल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी जगन्नाथ विठ्ठलदास बजाज (वय-७२) व्यापार यांनी दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी जगन्नाथ बजाज यांची शहराच्या मध्यवस्तीत सिटी सर्व्हे क्रं.१४७४ व १४७५ हि स्वमालकीची जागा असून
त्या ठिकाणी मनसेचा कार्यकर्ता आरोपी अलीम शहा व अन्य दोन आरोपीनी अनाधिकाराने अतिक्रमण करून फिर्यीदचे वरिल वर्णनाचे व किंमतीचे पत्रे व अडगळीची लाकडे ही त्यांचे संमतीशिवाय,स्वतःचे फायद्याकरीता,लबाडीचे इराद्याने चोरुन नेवुन फिर्यादीचे गाजेत अतीक्रमण केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त से की,फिर्यादी जगन्नाथ बजाज यांची शहराच्या मध्यवस्तीत सिटी सर्व्हे क्रं.१४७४ व १४७५ हि स्वमालकीची जागा असून
त्या ठिकाणी वरील आरोपी अलीम शहा,संगीता पंडोरे,अरून पंडोरे आदींनी अनाधिकाराने अतिक्रमण करून फिर्यीदचे वरिल वर्णनाचे व किंमतीचे पत्रे व अडगळीची लाकडे ही त्यांचे संमतीशिवाय,स्वतःचे फायद्याकरीता,लबाडीचे इराद्याने चोरुन नेवुन फिर्यादीचे गाजेत अतीक्रमण केले आहे.वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.दरम्यान आरोपीत मनसे पक्षाचा कार्यकर्ता सामील असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी अलीम शहा,संगीता पंडोरे,अरून पंडोरे आदीं विरोधात आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८५७/२०२० भा.द.वि.कलम ३७९,४४७,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.