जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात अवैध व्यावसायिकांवर छापे,पाच जणांवर गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या भिंतीच्या आडोशाला आधार घेऊन आरोपी इरफान लिकायत दारुवाला (वय-३९) रा.खडकी,सुनील लहू वायकर,(वय-३६) इंदिरानगर,अजमल्ली,बाकरली अन्सारी (वय-४२) रा.खडकी,कोपरगाव आदींना आकड्याचा खेळ खेळताना कोपरगाव शहर पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्याच्या विरोधात विविध तीन गुन्हे तर अवैध दारू निर्मिती प्रकरणी आरोपी सोमनाथ लक्ष्मण शिंदे,गोरख सोमनाथ इंगळे शिंगणापूर यांचे विरुद्ध दोन असे पाच विविध गुन्हे दाखल केल्याने अवैध व्यवसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबई जुगार कायदा प्रतिबंधक कलमान्वये जुगार खेळणे कायद्याने प्रतिबंध केलेला असताना काही नागरिक अतिरिक्त पैशाचा मोह धरून जुगार खेळून आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत आणीत असतात.असेच तीन नमुने कोपरगाव शहर पोलिसांना आढळून आले असून यांच्यावर कोपरगाव शहर पोलिसानी विविध गुन्हे दाखल केले आहे.तर अवैध दारू प्रकरणी आरोपी सोमनाथ लक्ष्मण शिंदे,गोरख सोमनाथ इंगळे शिंगणापूर यांचे विरुद्ध दोन अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

मुंबई जुगार कायदा प्रतिबंधक कलमान्वये जुगार खेळणे कायद्याने प्रतिबंध केलेला असताना काही नागरिक अतिरिक्त पैशाचा मोह धरून जुगार खेळून आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत आणीत असतात.असेच तीन विविध नमुने कोपरगाव शहरात पोलिसांना आढळून आले असून दि.२१ डिसेंबर रोजी सुनील वायकर हा इंदिरा शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर भगत यांचे हॉटेल जवळ मोकळ्या जागेत सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे त्याच्या कडील १ हजार ५०० रुपयांचा रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.तर तर दि.२२ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास इरफान दारुवाला हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्याच्या भिंतीचा आधार घेऊन हे कृत्य करताना आढळून आला आहे.त्याला रंगेहात पकडून त्याच्या कडिल रुपये २८० रुपये रोख व जुगाराचे साहित्य,आकडे लिहिलेले कागद कार्बन,निळा पेन आदी साहित्य मिळून आले आहे.तर आजमल्ली अन्सारी हा खंडकनाला भागात गॅरेंजलाईन जवळ संदीप कोपरे यांचे घरासमोर काटवनात कल्याण नावाचा मटका खेळताना व खेळवताना आढळून आला आहे.त्याच्या कडील ७५० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसानी जप्त केले आहे.

या बाबत फिर्यादी पो.कॉ. सचिन रामनाथ शेवाळे (वय-३३) यांनी आरोपी इरफान दारुवाला याचे विरुद्ध तर फिर्यादी संदीप शांताराम काळे पो.कॉ.यांनी सुनील वायकर व आजमल्ली अन्सारी याचे विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करून मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे तीन गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड.सहाय्यक फौजदार एस.जी ससाणे आदी अधिकारी करीत आहेत.

तर याखेरीज अवैध दारू निर्मिती करून नागरिकांच्या जीविताशी खेळल्या प्रकरणी आरोपी सोमनाथ लक्ष्मण शिंदे,रा.टाकळी नाका, कोपरगाव,व गोरख सोमनाथ इंगळे शिंगणापूर यांचे विरुद्ध पो.कॉ.सुरजकुमार अग्रवाल,व बी.बी कुंढारे आदींनी दोन अन्य गुन्हे दाखल केले आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close