जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

संवत्सरात १.८४ लाखांची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहात असलेल्या आपल्या आजीच्या घरी ती बाहेरगावी गलेली असताना काल मध्यरात्रीच्या दीड वाजेच्या सुमारास कोणातरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख ८० हजारांची रक्कम व सोन्या चांदीचे दागिने व अन्य चीज वस्तू असा तब्बल ०१ लाख ८४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद पूजा प्रशांत आहेर (वय-२२) रा.लोणी.ता.राहाता यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

घरमालक काही कारणानिमित्त बाहेर गावी गेल्याची माहिती कोणा तरी अज्ञात पाळत ठेवलेल्या इसमास मिळाली असावी व त्याने या संधीचा उपयोग करत रविवार दि.२० डिसेंबर रोजी रात्री व पहाटे दीड वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाट व अन्य चिजवस्तूंची उचक-पाचक करून त्यातील रोख ८० हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने व अन्य चीजवस्तू घेऊन पोबारा केला आहे

सदरचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आपली आजी ह्या संवत्सर शिवारात रहात असून आपण राहाता तालुक्यातील लोणी या ठिकाणी रहात आहे.आपली आजी काही कारणानिमित्त बाहेर गावी गेल्याची माहिती कोणा तरी अज्ञात पाळत ठेवलेल्या इसमास मिळाली असावी व त्याने या संधीचा उपयोग करत रविवार दि.२० डिसेंबर रोजी रात्री व पहाटे दीड वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाट व अन्य चिजवस्तूंची उचक-पाचक करून त्यातील रोख ८० हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने व अन्य चीजवस्तू घेऊन पोबारा केला आहे.या प्रकरणी फिर्यादी पूजा आहेर यांनी काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसानी गु.र.क्रं.८४६/२०२० भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने संवत्सर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.व या चोरीचा तपास लावण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close