गुन्हे विषयक
कुत्र्याच्या कारणावरून दोन गटांत मारहाण,आठ जणांवर गुन्हा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले आरोपी मच्छीन्द्र बबन खैरे,सोमनाथ बबन खैरे,बबन शंकर खैरे आदींनी तुम्ही नेहमी कुत्र्याच्या कारणावरून आमच्याशी भांडण करता असे म्हणून यातील आरोपीत मचकूर यांनी संगमनत करून लोखंडी गज व लोखंडी फुकणी धरून यातील फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून दुखापत केली तसेच शिवीगाळ केल्याच्या कारणावरून फिर्यादी बाळू शंकर खैरे (वय-४०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी बाळू शंकर खैरे व आरोपी मच्छीन्द्र बबन खैरे यांचे घर शेजारी-शेजारी आहे.त्यांचा किरकोळ कारणावरून वाद आहेत.दि.रविवार दि.१३ डिसेंम्बर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी मच्छीन्द्र बबन खैरे,सोमनाथ बबन खैरे,बबन शंकर खैरे आदींनी तुम्ही नेहमी कुत्र्याच्या कारणावरून आमच्याशी भांडण करता असे म्हणून दोन्ही गटात मारहाण झाली आहे तर दुसऱ्या गटाने उकिरड्याच्या कारणावरून हि हाणामारी झाल्याचे म्हटले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी बाळू शंकर खैरे व आरोपी मच्छीन्द्र बबन खैरे यांचे घर शेजारी-शेजारी आहे.त्यांचा किरकोळ कारणावरून वाद आहेत.दि.रविवार दि.१३ डिसेंम्बर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी मच्छीन्द्र बबन खैरे,सोमनाथ बबन खैरे,बबन शंकर खैरे आदींनी तुम्ही नेहमी कुत्र्याच्या कारणावरून आमच्याशी भांडण करता असे म्हणून यातील वरील आरोपीनी संगमनत करून लोखंडी गज व लोखंडी फुकणी धरून यातील फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून दुखापत व शिवीगाळ केली आहे.
तर दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी सोमनाथ बाळू खैरे (वय-२५) रा.ब्राम्हणगाव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपल्या घरासमोर आपले पत्नीस आरोपी महेंद्र बाळू खैरे,तुळशीराम शंकर खैरे,अनिल खैरे,बाळू शंकर खैरे,अलका बाळू खैरे सर्व रा. ब्राह्मणगाव यांनी उकिरडा काढण्याच्या कारणावरून मारहाण केली असता यातील फिर्यादी हा आरोपी मजकूर यांना,”फिर्यादीच्या पत्नीस मारहाण का केली ? असे विचारले असता त्याचा आरोपी यांना राग येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी महेंद्र खैरे याने त्याच्या हातातील गजाने फिर्यादी च्या डोक्यावर मारहाण करून दुखापत केली व आरोपी तुळशीराम खैरे व अनिल खैरे व अन्य आरोपींनी आपल्याला शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली व दमदाटी केली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे.
या प्रकरणी कोपरंगाव तालुका पोलीसांनी आपल्या दप्तरी अनुक्रमे गु.र.क्रं.५५३/२०२०,गुन्हा र.क्रं.५५४/२०२०,भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.