जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तहसील कार्यालयात नगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आकस्मितरीत्या भेट दिली असून तालुक्यातील विविध विभागांच्या प्रलंबित कामांचाआढावा घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

डॉ.राजेंद्र भोसले यांनी औद्योगिक वसाहत,पाच क्रमांक साठवण तलाव या ठिकाणी भेट देवून स्थळ पहाणी केली आहे.मात्र पत्रकारांना याबाबत महसूल विभागाने अंधारात का ठेवले हे समजू शकले नाही.

कोपरगाव तालुक्यात शेती सिंचनाचा प्रश्न,पिण्याच्या पाण्याची चोरी,अपव्यय,चोवीस तासाच्या अवैध नळ जोडण्या,प्रलंबित पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न,पावसाळ्यात झालेला रस्त्यांचा बट्याबोळ, नवीन रस्त्यांचा अभाव,गोदावरीचे दूषित पाणी,बस स्थानकाचे प्रलंबित काम,शहरातील विस्थापितांचा गत नऊ वर्षापासूनच प्रलंबित असलेला प्रश्न,तालुक्यात बेसुमार वाढलेले बेरोजगारीचे प्रश्न,औद्योगिक वसाहतीत जन सामान्य उद्योगांना मिळत नसलेल्या जागा,कोरोना काळातील वीज बिलाच्या माफीचा प्रश्न,महसूल विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचार,कोरोना साथीचे होत नसलेले नियंत्रण,आदी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचा अनक्षेपीत दौरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोपरगाव येथे तहसिल कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या आढावा बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. आ.आशुतोष काळे,उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे यावेळी स्वागत केले.तहसिलदार योगेश चंद्रे यांनीही शाल, पुष्पगुच्छ व “असे होते कोपरगाव” हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील विविध प्रलंबित समस्या मांडल्या आहेत.

उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसिलदार योगेश चंद्रे,कृषी अधिकारी अशोक आढाव,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बोरसे,पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, सामाजिक वनीकरण वनपरीक्षेत्र अधिकारी पुजा पिंगळे, वनरक्षक रामकृष्ण सांगळे,गोदावरी डावा कालव्याचे भरत दिघे,गोदावरी उजवा कालव्याचे महेश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे,आगर व्यवस्थापक अभिजित चौधरी,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे सह सर्व प्रशासकीय कार्यालयाचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.

सुमारे पाच तासांच्या कोपरगाव तालुक्याच्या भेटीत जिल्हाधिकारी यांनी दोन स्थळांची पाहणी केली आणि विविध खाते प्रमुखांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत आरोग्य विभागाच्या कोरोना संसर्ग निर्मुलन उपाय योजना, कोपरगाव नगरपरिषदेचे पाणी साठवण तलावाचे संभाव्य कामकाज,पाटपाण्याचे आवर्तन नियोजन,सामाजिक वनीकरणाचे वृक्षारोपण,शहर व तालुका पोलिस स्टेशन कामकाज,नवीन वाहन खरेदी,कृषी विभागाचे रब्बी पिक पेरणी नियोजन व अनुदान वाटप अहवाल, शासनाच्या मालकीच्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती यासह विविध खातेनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला.बैठकी दरम्यान कोपरगाव नगरपरिषद निगडित विविध समस्यांचे निवेदन स्थानिक संघटनांनी मांडले. त्यावर पुढील कार्यवाही करण्याची सुचना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी औद्योगिक वसाहत,पाच क्रमांक साठवण तलाव या ठिकाणी भेट देवून स्थळ पहाणी केली आहे.मात्र पत्रकारांना याबाबत महसूल विभागाने अंधारात का ठेवले हे समजू शकले नाही.

कोरोना संसर्ग प्रादुर्भाव निर्मुलनासाठी संकटकाळात महसूल,वैद्यकीय, पोलीस,नगरपालिका,पंचायत समिती यासह विविध शासकीय कार्यालये,शेतकरी,स्वयंसेवी संस्था,दानशूर नागरिकांनी केलेल्या कार्याचे समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close