गुन्हे विषयक
घर खाली करण्यास सांगितल्याने,विटाने मारहाण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लिंभारा मैदानानजीक नजीक रहिवाशी असलेल्या फिर्यादी चांदणी संतो महाले (वय-३५) हिने भाडेकरूस घर खाली करण्यास सांगितल्याचा राग येऊन आरोपी निलेश सुनील महाले,सुनीता साळवे व बाल्या (पूर्ण नाव माहित नाही) यांनी काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर येऊन आपल्या विट डोक्यात फेकून मारून व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काल दुपारी चार वाजेच्या सुमारास दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादिस आपल्या काही कारणासाठी खाली करून हवे होते म्हणून त्यांनी ते आरोपी तथा भाडेकरूस खाली करून मागितले होते.याचा आरोपी निलेश सुनील महाले,सुनीता साळवे व बाल्या (पूर्ण नाव माहित नाही) यांना राग आला व त्यांनी विटाच्या तुकड्याने आधी मारहाण केली व त्यानंतर लाथा बुक्यांनी घरासमोर येऊन फिर्यादिस मारहाण करून जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी चांदणी महाले हिने आपले घर आरोपी निलेश महाले,सुनीता साळवे यांना भाड्याने दिले आहे.सदरचे घर फिर्यादिस आपल्या काही कारणासाठी खाली करून हवे होते म्हणून त्यांनी ते आरोपी तथा भाडेकरूस खाली करून मागितले होते.याचा आरोपी निलेश सुनील महाले,सुनीता साळवे व बाल्या (पूर्ण नाव माहित नाही) यांना राग आला व त्यांनी विटाच्या तुकड्याने आधी मारहाण केली व त्यानंतर लाथा बुक्यांनी घरासमोर येऊन फिर्यादिस मारहाण करून जखमी केले आहे.या प्रकरणी फिर्यादी चांदणी महाले हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,सहाय्यक फौजदार एस.सी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरंगाव शहर पोलीसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८३९/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३३७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे पोलीस ठाण्यात आरोपी निलेश महाले,सुनीता साळवे व बाल्या यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी पवार हे करीत आहेत.