गुन्हे विषयक
आयशर टेम्पोची बैलगाडीस धडक,दोन बैल जागीच ठार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास ऊस तोडीस आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील सेवानगर येथील बैल गाडीस आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास मागून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने (क्रं.एम.एच.१२ एच.डी.२४२२) तींनचारी येथून आपल्या अड्ड्यावरुन जेऊर कुंभारी येथील ऊस तोडीस जाणाऱ्या बैल गाडीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऊस तोडणी कामगार विष्णू मदन राठोड (वय-४०) यांच्या गाडीचे दोन्ही बैल जागीच ठार झाले असून गाडीचालक हे गंभीर जखमी झाले आहे.
जेऊर कुंभारी येथील ग्रामपंचायत हद्दीत आज पहाटे ऊस तोडणीसाठी जात असता त्यांच्या गाडीस मागील बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या वरील क्रमांकाच्या आयशर टेम्पोवरील चालकाने जोराची धडक दिली त्यात त्यांची गाडी हि रस्त्याच्या खाली जोराने जाऊन पडली या अपघातात दोन्ही बैल जागीच ठार झाले आहे तर विष्णू राठोड हे गाडीवान गंभीर जखमी झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राजाराम राठोड व त्यांचे सहकारी हे ऊसतोडणी करण्यासाठी कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उसतोडणीसाठी मुकादम कैलास हाटेसिंग राठोड यांचे टोळी मार्फत आलेले आहेत.त्यांचा अड्डा हा कोकमठाण येथील तीनचारी येथील शेती महामंडळाचे शेतजमीत सध्या आहे.ते आपल्या सहकारी कामगारा सोबत असलेल्या सात गाड्यांच्या सोबत सर्वात शेवटी विष्णू राठोड यांची बैलगाडी जेऊर कुंभारी येथील ग्रामपंचायत हद्दीत आज पहाटे ऊस तोडणीसाठी जात असता त्यांच्या गाडीस मागील बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या वरील क्रमांकाच्या आयशर टेम्पोवरील चालकाने जोराची धडक दिली त्यात त्यांची गाडी हि रस्त्याच्या खाली जोराने जाऊन पडली या अपघातात गाडीचालक विष्णू राठोड यांचे दोन्ही बैल जागीच ठार झाले आहे तर विष्णू राठोड हे गाडीवान गंभीर जखमी झाले आहे.त्यांच्या सहकाऱ्यांनी या बाबत तातडीने कारखाना कार्यालयास कळविले व त्यांनी घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका पाठवून जखमीस सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे.घटनास्थळावरून टेम्पो चालक फरार झाला आहे.
या प्रकरणी सहकारी फिर्यादी गाडीवान राजाराम हाटेशिंग राठोड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आयशर टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८३१/२०२० भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७,४२९ व मोटार वाहन कायदा १३४,(अ),(ब)१८४,१७७ प्रमाणे टेम्पो अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी,ससाणे हे करीत आहेत.घटनास्थळी पोलीस निरीक्षक गवळी.पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,तपासी अंमलदार ससाणे यांनी भेट दिली आहे.