गुन्हे विषयक
..या गावातील नागरिकांत चोरट्यांची दहशत !

जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोहगाव,तांबे नगर,विठ्ठल नगर,राधाकृष्ण नगर,पाटील वाडी,परिसरात हत्यारबंद चोरांनी धुमाकूळ घातल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या आठ दिवसापासून शेकोट्या पेटवून रात्र जागून काढावी लागते आहे.या चोरट्यांचा लोणी पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
लोणी पोलीस स्टेशनच्या माहितीनुसार आरोपी शरदराव साहेब सावंत (वय-३०) राहणार दहेगाव बोलका तालुका कोपरगाव यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास सूर्यवंशी करत आहे.पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले आहे मग रात्रीच्या वेळेस अचानक गावात कुठेतरी आवाज येतो.व नागरिकांची एकच पळा पळ होते.तर,”काही उसात लपला,”जागे रहा”यामुळे परिसरातील प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.पोलिस प्रशासनास वचक कमी झाल्यामुळे आरोपींची मनोधैर्य वाढले आहे.त्यास जबाबदार कोण.असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे या सर्व गोष्टींवर पोलिसांनी धडक मोहीम राबवून सदर आरोपीस अटक करून येथील नागरिकांना दहशती पासून मुक्तता करावी अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.