जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

उद्धव सेनेला अद्याप दिलासा नाही,कोपरगावत चिंता ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

मुंबई येथील उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला समर्थनार्थ सादर केलेली हजारो शपथपत्रे बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता.त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नगर जिल्ह्यातील कोपरगाव सह चार पथके राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करत होते.अखेर मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून ठाकरे गटाने दिलेली शपथपत्र बोगस नसल्याचं चौकशीतून स्पष्ट झालं असल्याचा दावा शिवसेनेने केला असला तरी कोपरगावातील चौकशी पथकाने प्रमुख मधुकर सानप यांनी अद्याप तपास संपला नाही त्यामुळे अंतिम निष्कर्ष आपण दिला नसल्याचे सांगून उद्धव शिवसेनेची धाकधूक वाढवली आहे.

“कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेले तीन दिवस ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत.त्या प्रत्येकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली होती.त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की नाही याची खात्री केली.त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिलं आहे असं आपल्या जबाबात सांगितले आहे”-राजेंद्र झावरे,उत्तर जिल्हा प्रमुख,उद्धव शिवसेना.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठी उलथापालथ झाली आहे.शिंदे गटाकडून शिवसेना पक्षासह चिन्ह मिळू नये यासाठी डाव-प्रतिडाव खेळले गेले होते.”तुम्ही खरे की,आम्ही खरे” असा राजकिय शिमगा रंगला होता.आमचीच खरी शिवसेना असून आम्हाला पक्ष व चिन्ह आम्हाला मिळावं,असं शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे म्हटलं होतं.निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.मात्र,शिंदे गटाने ठाकरे यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा दावा केला होता.त्या मुळे राज्यात मोठे राजकीय वादळ उठले होते.

ठाकरे गटाची जवळपास ४ हजार ५०० प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता.त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून आपला तपास सुरू केला होता.कोल्हापूरसह नाशिक,पालघर,अ.नगर जिल्ह्यातील कोपरगाव या सारख्या ठिकाणी पोलिसांचे पथक दाखल झाले होते व तपास करण्यात येत होता.त्यात कोपरगाव येतील पथकाचे नेतृत्व मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी केले होते.
बोगस शपथ प्रतिज्ञाप्रकरणी अखेर गुन्हे शाखेचा तिन दिवसीय तपास पूर्ण झाला असून ही शपथपत्र तपासणी अद्याप संपली नसल्याचा खुलासा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी केला आहे.त्यामुळे शिवसेना बुचकळ्यात सापडली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेले तीन दिवस ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत.त्या प्रत्येकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली होती.त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की नाही याची खात्री केली.त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिलं आहे असं आपल्या जबाबात सांगितले आहे”असे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान राज्यात “ती प्रतिज्ञापत्र बोगस किंवा खोटं असल्याचं आत्तापर्यंतच्या चौकशीत कुठेही निदर्शनास आलं नाही असे काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे.मात्र हि कोपरगाव तालुका उद्धव शिवसेनेच्या दुष्टीने अद्याप त्यांची धाकधूक संपलेली नाही.त्यामुळे उत्तर जिल्हा शिवसेनेत चलबिचल सुरु झाली असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close