गुन्हे विषयक
कोपरगावात महावितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना कालखंडातील वीजबिल माफ करावे व सामान्य जनतेला दिलासा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी आज जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या नेतृत्वात आक्रमक होत महावितरण कंपनींच्या कार्यालयावर आज आपला राग व्यक्त करत अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालयाची तोडफोड करून शासनाला थेट आव्हान दिले आहे.त्यामुळे कोपरगावात पोलिसांची ऐनवेळी एकाच धावपळ उडालेली दिसून आली आहे.
कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती.अनेकांची कामं,उद्योग ठप्प होते.त्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे.यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत.कोरोना काळात वापरलेल्या विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते मात्र त्यांनी अंगठा दाखवल्याने आता त्याचे परिणाम दृश्य स्वरूपात दिसू लागले आहेत.त्याचा परिणाम कोपरगावात दिसून आला आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती.अनेकांची कामं,उद्योग ठप्प होते.त्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे.यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत.कोरोना काळात वापरलेल्या विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते.मात्र ऐनवेळी उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरण्याचे आवाहन केल्याने सगळीकडे नाराजी व्यक्त होत आहे.आता महा आघाडीत आता या वीज बिल माफीवरून तू-तू-मै-मै चालू आहे.त्यामुळे टाळेबंदीच्या काळातील भरमसाठ वीजबिल आल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.राज्य सरकारचे घूमजाव घरगुती वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोपरगावमध्ये हि मोठी नाराजी आहे.त्यामुळे कोपरगाव मनसेच्या वतीने वारंवार सरकारला इशारा देण्यात आला आहे.किमान तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा अशी मागणी मनसेने वारंवार करूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही.त्यामुळे नागरिकांत व शेतकऱ्यांत मोठी नाराजी निर्माण झाली आहे.त्यांचे नेतृत्व आज म.न.से.ने केले आहे.त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,सुनील फंड,योगेश गंगवाल, आदींनी हे आंदोलन केले आहे.त्यांना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,उपनिरीक्षक भरत नागरे यांनी या कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे.व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले आहे.पुढील कार्यवाही सुरु आहे.या घटनेत काही अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून कार्यालयात सर्वत्र काचा आणि कुर्च्यांची तोडफोड दिसून येत आहे.त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.