गुन्हे विषयक
शिर्डीनजीक एकाचा खून,अकरा जणांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक हाकेच्या अंतरावर असलेल्या निमगाव ग्रामपंचायत हद्दीत देशमुख चारी शेजारी राहणाऱ्या आरोपी अजय वैजनाथ भांगे,विशाल रमेश पाटील,रवींद्र बनसोडे,यांचे विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून वरील आरोपींसह अकरा जणांनी रवींद्र साहेबराव माळी रा.सदर यांनी साई श्रद्धा किराणा स्टोअर समोर मयताच्या यांच्या मानेवर चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना रात्री साडे दहाच्या सुमारास घडल्याने निमगाव व शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.
राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे व आरोपी यांचे काही कारणावरून भांडण झाले होते.त्यामुळे मयत रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला होता.याचा त्याच परिसरातील रहिवाशी असलेले आरोपींच्या मनात राग होता.त्यातून हि दुर्दैवी घटना घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे व आरोपी यांचे काही कारणावरून भांडण झाले होते.त्यामुळे मयत रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला होता.याचा त्याच परिसरातील रहिवाशी असलेले आरोपींच्या मनात राग होता.त्यांनी एकत्र जमून फिर्यादीचे वडील रवींद्र माळी यांना आरोपी विशाल रमेश पाटील,रा.चांगदेवनगर निमगाव,रवींद्र बनसोडे,रा.जोशी शाळा,समीर शेख रा.राहाता, यांनी धक्काबुक्की करून धरून ठेवले व अन्य आरोपी अज्जू पठाण रा.निमगाव,रंजना वैजनाथ भांगे,ललिता रमेश पाटील दोघी रा.निंमगाव,, अक्षय शिंदे, जगताप,अजय वैजनाथ भांगे,तर अन्य दोन अल्पवयीन आरोपी यांनी त्यांच्या हातातील धारदार चाकूने मयत रवींद्र माळी याचे मानेवर जोराने वार करून दुखापत करून रात्री १०.३० वाजता खून केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी रोहित रवींद्र माळी (वय-१६) मयताचा मुलगा याने शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी अजय वैजनाथ भांगे,विशाल रमेश पाटील,रवींद्र बनसोडे,समीर शेख,राजू पठाण,रंजना वैजनाथ भांगे,ललिता रमेश पाटील,सुनील लोखंडे,अक्षय शिंदे,महेश गायकवाड,कुणाल जगताप,सर्व अकरा आरोपी सर्व रा.निमगाव यांचे विरुद्ध गु.र.क्रं.७४८/२०२० भा.द.वि.कलम ३०२,१२०,(ब),१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.व आरोपी रंजना भांगे,ललिता पाटील,सुनील लोखंडे,अक्षय शिंदे,महेश गायकवाड आदी पाच आरोपीना अटक केली आहे.तर अन्य आरोपींचा शोधात शिर्डी पोलीस आहेत.या घटनेने राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.व नुकतेच शिर्डी साईबाबा मंदिर उघडले असताना हि धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे हे करीत आहेत.त्यांची नुकतीच या ठिकाणी नेमणूक झाली असताना त्यांना आरोपी शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.