गुन्हे विषयक
कोपरगावातून मुलगा पळवला,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातिल रहिवाशी असलेल्या व भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या पस्तीस वर्षीय महिलेचा अल्पवयीन मुलगा विशाल रमेश भाकरे (वय-१५) हा सोमवार दि.०३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०७ वाजेच्या दरम्यान कोपरगाव बेट येथून अज्ञात ईसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गायब मुलाची आई सुनीता रमेश भाकरे (वय-३५) यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे कोपरगाव बेट परिसरात खळबळ उडाली आहे.