गुन्हे विषयक
महिलेची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील निवारा परिसरात रहिवाशी असलेली महिला उर्मिला नंदलाल मुंदडा (वय-६५) या महिलेने अज्ञात कारणाने नुकतीच विषारी औषध प्रश्न करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास खबर दिली असून पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
दरम्यान या महिलेने आपल्या प्रदीर्घ आजारास कंटाळून हि आत्महत्या केल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सदर मयत महिला हि कोपरगाव येथील रहिवाशी असून त्या जेष्ठ नागरिक होत्या.मात्र त्यांनी दि.१७ ऑक्टोबर रोजी अज्ञात कारणाने घरात कोणी नाही हो संधी साधत कीटकनाशक औषधांची बाटली जवळ बाळगून त्यातील औषध अचानक प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.त्यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते.उपचार सुरु असताना त्यांची जीवन ज्योत दि.२६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४० वाजता मालवली आहे.दरम्यान या महिलेने आपल्या प्रदीर्घ आजारास कंटाळून हि आत्महत्या केल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत.
या बाबत शिर्डी येथील वैद्यकीय अधिकांऱ्यानी दिलेल्या खबरीवरून कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात ५४/२०१९/सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.