जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बालकवींना व्यासपीठ निर्माण करून देणे गरजेचे-माजी नगराध्यक्ष पाटील

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शालेय जीवनापासूनच व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या संधी आणि नवनिर्मितीला व्यासपीठ निर्माण करून दिल्यास खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा गुणात्मक विकास होण्यास मदत होते असे प्रतिपादन कोपरगांव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नुकतेच कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा आणि कला सांस्कृतिक क्षेत्राला आवश्यक त्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे-मंगेश पाटील,माजी नगराध्यक्ष

कोपरगाव शहरातील संकल्पनाच्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुखनपाहुणे म्हणून बोलत होते.कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मयूर तिरमखे हे होते.

सदर प्रसंगी चेतन गवळी,रोहीत शिंदे,प्रा.गजानन पंडीत, वैभव बिडवे,कल्पना निंबाळकर,प्रा.मधुमिता निळेकर,प्रा.संदीप नलगे,आरती सोनवणे,शुभम आहेर,श्रीकांत साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा आणि कला सांस्कृतिक क्षेत्राला आवश्यक त्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असेही ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी मसूटा हा ज्वलंत सामाजिक विषय घेवून मराठी सिनेसृष्टीत मानाचे स्थान निर्माण करून देणारे चित्रपट निर्माते भरत मोरे यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाउल टाकल्यानंतर आज माझा हा पहिलाच सन्मान झाला त्यामुळे तो एखाद्या मानाच्या पुरस्कारापेक्षा कमी नाही असे भरत मोरे म्हणाले.

या प्रसंगी शालेय,महाविद्यालय,खुल्या गटातील प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम आहेर,श्रीकांत साळुंके यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.सुनिता सूर्यवंशी यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव गणेश सपकाळ यांनी मानले.

Related Articles

Close