गुन्हे विषयक
..या संस्थेच्या संस्थापकावर गुन्हा दाखल !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील समता नागरी सह पतसंस्था संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांचेवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये ०३ कोटी ६५ लाख रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या गुन्ह्यात संस्थापकास मदत करणाऱ्या संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तक्रारदार हा आमच्या संस्थेचा नाशिक येथील थकबाकीदार असून तेथील गृहप्रकल्पात त्याने त्याच्या अनेक फ्लॅटधारकांना आमच्या संस्थेचे बनावट शिक्के वापरून फसवणूक केलेली आहे.इतर बँकांची अशीच फसवणूक केली आहे.त्या विरोधात नाशिक पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.या खेरीज आम्हाला खोटे धनादेश दिल्याने त्या विरोधात कलम १३८चे गुन्हे दाखल आहे.त्या बाबत तक्रारदार हा कारागृहात गेलेला आहे.व आमच्या संस्थेचे कर्ज बुडविण्यासाठी हा प्रकार केला आहे-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष समता पतसंस्था.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,नाशिक येथील एस . व्हि.ठोंबरे अँड असोसिएट्सचे एस.व्ही.ठोंबरे यांना शिर्डी येथे गृह प्रकल्पासाठी व्यावसायिक प्लॉट आवश्यक असल्यामुळे त्यांनीं प्रशांत डाकले यांच्या कन्सल्टन्सी सेवेशी संपर्क साधला होता.सचिन भट्टड हे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक असल्यामुळे त्यांची ओळख त्यांनी करून दिली होती.त्यांनी रुई ता.राहाता येथे गट नंबर ४०१ मध्ये १ हेक्टर १७ आर.जमीन उपलब्ध असून त्या बाबतीत ०६ कोटी २५ लाख रुपये किंमत ठरवण्यात आली व त्यासाठी २९ ऑक्टोबर २०१३ मध्ये नोटरी मार्फत ईसार पावती रुपये १ कोटी,२३ लाख ७५,००० रोख करण्यात आली आहे व उर्वरित रक्कम ५ कोटी ०१ लाख २५ हजार रुपये दस्त नोंदणीच्या वेळी देण्याचे ठरले होते.
दरम्यान डाकले व भट्टड यांनी समता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष कोयटे यांच्याशी ओळख करून दिली व त्यांनी पुढील व्यवसायासाठी पतपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.तसेच प्रशांत डाकले यांनी जमीन गहाण खत करून बँकेकडे ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कर्जदार व जमीन मालक प्रशांत डाकले यांच्या नावाने एक कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.मात्र याच मिळकतीवर प्रशांत डाकले यांनी संस्थेकडे अगोदरच गहाण खत करून त्यावर कर्ज काढले होते व पतसंस्थेला याची पूर्ण कल्पना असताना देखील फसविण्याच्या उद्देशाने त्यांनी हा व्यवहार केला असल्याचा आरोप आहे. तसेच तक्रारदार एस.व्ही.ठोंबरे यांचा नाशिक येथील प्रकल्पाचे गहाण खत करून तोही दोन कोटी कर्जाच्या वसुलीसाठी जप्त करण्यात आला त्यामुळे फिर्यादीचे मोठे नुकसान झाले असा त्यांचा दावा आहे.
जमिनीवर आधीच आयकर खात्यातर्फे जप्ती आदेश
ज्यावेळेस तक्रारदार हे जमिनीच्या ७/१२ व इतर कागदपत्र मागण्यासाठी तलाठी व तहसिलदार यांच्याकडे संपर्क केला असता सदरील जमिनीवर आयकर विभागाने ०३ ऑगष्ट २०१७ रोजी जप्ती आदेश बजावले असल्याचे पत्र त्यांच्या निदर्शनास आले.पतसंस्थेने थकबाकीदार यांना वाचविण्यासाठी श्रीपाद ठोंबरे यांना दोन कोटीचे कर्ज मंजूर करून ते परस्पर डाकले यांच्याकडे हस्तांतर करण्यात आले.तसेच तक्रारदारकडून ३ कोटी ६५ लाखांचा भरणा करून घेण्यात आला.वरील सर्व व्यवहार झाल्यानंतर डाकले यांनी नोंदणीकृत खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.तसेच पतसंस्थेने तक्रारदारावर वसुलीच्या बाबतीत कार्यवाही सुरू केली तेव्हा नियोजितपणे फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
नंतर तक्रारदाराने पोलीस निरीक्षक,शिर्डी पोलीस ठाणे यांच्याकडे फसवणूकी बाबत तक्रार दाखल केली मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे पोलीस अधीक्षक नगर यांचे कडे तक्रार केली होती.शेवटी कार्यवाही न झाल्यामुळे प्रथमवर्ग न्यायाधीश राहाता यांच्या कोर्टात तक्रार क्रमांक ५२९/२०१९ दाखल करण्यात आले.न्यायालयाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून प्रथम दर्शनी कर्जदारांची खोटे दस्तावेज करून व फसवणुकीच्या दृष्टीने तारण व जप्त मालमत्ता खरेदी करण्यासाठी भाग पाडून संगनमताने फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्याने फौजदारी संहीता १५६ (३) नुसार पोलीस ठाणे शिर्डी यांना तपास करून त्याचा अहवाल दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.
या प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष कोयटे, डाकले,व्यवस्थापक भट्टड यांच्यावर दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी गुन्हा क्रमांक ६९४/२०२०भा. द.वि.४२०,४०६,४६७,४७१,४७२ व १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या प्रकरणांमध्ये पो.नि.दीपक गंधाले यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री घुगे हे पुढील तपास करत आहेत.