जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

फसवून लग्न,फारकतीसाठी वीस लाखांची मागणी,तरुणावर गुन्हा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील उच्च शिक्षित चोवीस वर्षीय तरुणीशी लगट करून फोटो काढले व तिला खोटे-नाटे सांगून न सांगता सही करून लग्न केले व दीड वर्षांनंतर फारकतीसाठी तब्बल वीस लाखांची रक्कम मागितली म्हणून आज कोपरगाव तालुका पोलिसानी त्याच माहेगाव देशमुख येथील आरोपी तरुण राहुल हसाळकर याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून नंतर तो हिंजवडी,पुणे या पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गावातील उच्च शिक्षित तरुणीस पुण्यास गाडीने सोडविण्यासाठी गेल्याने ओळख करून घेतली व त्याचे रूपांतर मैत्रीत केले व संपर्क वाढवून त्याचा गैरगफायदा घेऊन आरोपीने या तरुणीचे सोबत भेटीचे छायाचित्र काढले व त्या छायाचित्रांचा वापर करून त्या तरुणीचे वडील व भाऊ यांना उडवू देऊ अशी धमकी देऊन गैरफायदा घेऊन तिला फसवून सही घेऊन बळजबरीने लग्न केले व फारकतीसाठी वीस लाखांची मागणी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,माहेगाव देशमुख येथील आरोपी चालक असलेला तरुण राहुल हसाळकर याने उच्च शिक्षित असल्याचा आव आणून त्याच गावातील उच्च शिक्षित तरुणीस पुण्यास गाडीने सोडविण्यासाठी गेल्याने ओळख करून घेतली व त्याचे रूपांतर मैत्रीत केले व संपर्क वाढवून त्याचा गैरगफायदा घेऊन आरोपीने या तरुणीचे सोबत भेटीचे छायाचित्र काढले व त्या छायाचित्रांचा वापर करून त्या तरुणीचे वडील व भाऊ यांना उडवू देऊ अशी धमकी देऊन गैरफायदा घेऊन तिला फसवून सही घेऊन बळजबरीने लग्न केले.व त्याचे फोटो काढून फिर्यादी तरुणीची संमती नसताना लग्नाचे कागद तिला वाचून न दाखवता त्यावर सह्या घेतल्या होत्या.त्या नंतर फिर्यादी तरुणीने फारकत मागीतली असता फिर्यादीकडे २० लाख रुपयांची मागणी केली असल्याची फिर्याद दाखल केली आहे.हि घटना पुण्यातील हिंजवडी भागातील हॉटेल ऑरनेट समोरील स्वरा पॅराडाईज या इमारतीत ऑगष्ट २०१८ पासून ते मार्च २०२० च्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळोवेळी घडली असल्याचे फिर्यादीत पीडित तरुणीने म्हटले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी गुन्हा क्रं.००/२०२० भा.द.वि.कलम ४२०,३६६,३८५,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला आहे. व तो पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.पीडित तरुणीच्या घरी नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक अनिल कटके,पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी भेट दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close