गुन्हे विषयक
अज्ञात इसमाचा मृत्यू,खून की आत्महत्या नागरिकांत चर्चा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत गोदावरी नदी पात्रात आज सकाळी एका वय वर्षे पन्नास असलेल्या अज्ञात इसमाचे शव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,या प्रकरणी पोलिसांना याची ओळख अद्याप पटलेली नाही.या प्रकरणी पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.

या प्रकरणी त्याची ओळख पटली नसल्याचे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले असून कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांत कळविण्याचे आवाहन केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात गोदावरी नदीपात्रात थोडे बहुत पाणी प्रवाहित आहे.त्यात आज सकाळी मुर्शतपूर शिवारात आज एक मृत इसम पाण्यात फुगून वर तरंगत असल्याची खबर तालुका पोलिसांना मिळाली होती.त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पहिले असता त्या ठिकाणी एक शव आढळून आले आहे.
या प्रकरणी त्याची ओळख पटली नसल्याचे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले असून कोणाला काही माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे हे करीत आहेत.याबाबत ग्रामस्थांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.



