गुन्हे विषयक
पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपी तालुक्यातून अटक!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीतील रहिवासी असलेला आरोपी शुभम पिंपळे याने निफाड पोलिस ठाण्याचे हद्दीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी त्यास आज निफाड पोलिसांनी अटक केली आहे.त्याची रवानगी नाशिक जिल्ह्यात केली आहे.त्यामुळे या गुन्ह्याविरुद्ध उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीने वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान ही घटना दिनाक 14 जानेवारी रोजी रात्री 09 वाजेच्या सुमारास घडली होती.त्यानंतर निफाड पोलिस आरोपीच्या मागावर होते.त्याचा त्यांना काल सुगावा लागल्याने त्यांनी सापळा रचून त्याला आज कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीतून त्याच्या राहते घरातून अटक केली आहे.
पोस्कोचा गुन्हा म्हणजे १८ वर्षांखालील मुला-मुलींवर होणारा कोणताही लैंगिक अत्याचार,छळ किंवा पोर्नोग्राफी होय.हा कायदा मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणि दोषींना कठोर (७ वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत) शिक्षा देण्यासाठी केला आहे,ज्यामध्ये लैंगिक हेतूने स्पर्श करणे किंवा अश्लील कृत्य करणे यांचाही समावेश होतो.या घटनेत कमी येण्याची शक्यता असताना ती दिसत नाही म्हणून पालकांत चिंतेचे वातावरण आहे.अशातच आज कोपरगाव तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी असलेल्या पिंपळे याने निफाड तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत असा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान त्याचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.त्यात नंतर वाढीव कलम 64 (1) वाढविण्यासह पोस्कोचे कलम 4,8,12 वाढविण्यात आले असल्याची माहिती चौकशी अधिकारी सोनल फडोळ यांनी दिली आहे.
दरम्यान ही घटना दिनाक 14 जानेवारी रोजी रात्री 09 वाजेच्या सुमारास घडली होती.त्यानंतर निफाड पोलिस आरोपीच्या मागावर होते.त्याचा त्यांना काल सुगावा लागल्याने त्यांनी सापळा रचून त्याला आज कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीतून त्याच्या राहते घरातून अटक केली आहे.त्यासाठी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे सहाय्याने निफाड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव याचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनल फडोळ यांनी आज सायंकाळी भूमिका निभावली आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



