जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेल्वे स्थानकातील स्काय वॉक वरून एका पंचवीस वर्षीय तरुणाने ऐन रेल्वे येण्याच्या वेळी उडी मारून अयशस्वी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.त्याचे नाव चंद्रशेखर मोतीराम कवडकर असल्याची माहिती रेल्वे पोलिससुत्रांनी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रेल्वे संकल्पित छायाचित्र.

  

   दरम्यान एका माहितीनुसार सदर इसम हा मद्यधुंद अवस्थेत होता.शिवाय त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचे खिशात मद्याच्या बाटली आढळून आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून समजत आहे.तो रेल्वे आली त्यावेळी ही उडी मारणार होता.मात्र त्याच्या या प्रयत्नात रेल्वे निघाण गेल्यावर त्याची उडी पडल्याने तो बालंबाल बचावाला आहे. 

   जगभरात दरवर्षी सात लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात.पण,त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,15 ते 19 वर्ष या किशोरवयीन वयोगटात आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं प्रमुख कारण आहे.आत्महत्येमागे नैराश्य,असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते.यामागे वैद्यकीय कारणंही असतात.एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं,याला मानसोपचारतज्ज्ञ ‘सुसाइट आयडिएशन’ म्हणतात.अशीच घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास कोपरगाव रेल्वे स्थानकावर घडली असून यातील आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण मध्यप्रदेशातील असल्याची माहिती हाती आली आहे.त्याने एक रेल्वे गाडी येण्याच्या सुमारास रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे पूल ओलांडण्यास मदत करणाऱ्या पुलावरून हा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

संकल्पित चित्र.

   दरम्यान ही घटना काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.त्यावेळी त्याच्या कमरेला गंभीर इजा होऊन त्यातील हाड मोडले असल्याचे समजत आहे.या शिवाय त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती हाती आली आहे.त्याचे कमरेचे हाड मोडल्याने त्याला आज सायंकाळी 05 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे छायाचित्र.

  दरम्यान एका माहितीनुसार सदर इसम हा मद्यधुंद अवस्थेत होता.शिवाय त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचे खिशात मद्याच्या बाटली आढळून आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून समजत आहे.तो रेल्वे आली त्यावेळी ही उडी मारणार होता.मात्र त्याच्या या प्रयत्नात रेल्वे निघाण गेल्यावर त्याची उडी पडल्याने तो बालंबाल बचावाला असल्याचे समजत आहे.

*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close