जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पदाधिकाऱ्यांच्या नातलगांकडून मारहाण,युवती गंभीर जखमी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ०९ क्र मध्ये दि.१६ जानेवारी रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर आणि कुटुंबातील ०८ जणांनी कालेकर कुटुंबातील पाच व्यक्तींना जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.जखमींमध्ये तीन महिलांसह २२ वर्षीय युवतीचा समावेश असल्याचा आरोप सागर आहेर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

  

दरम्यान यातील आरोपी ही आपले कार्यकर्ते असले तरी या भांडणाशी आपला कोणताही संबंध नाही मात्र राजकीय कारणावरून आपले विरोधात असे वातावरण तापवले जात आहे असा आरोप कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केला आहे.

  याबाबत त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोल्हे गटाचे विद्यमान उपनगराध्यक्ष असलेल्या जितेंद्र रणशूर यांच्या प्रभाग क्र.०९ मध्ये कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत,”आम्हाला कमी मतदान मिळाले,तुम्ही आमचे काम केले नाही, आम्ही तुम्हाला पाहून घेवू” असे धमकावून जीवे मारण्याची धमकी रणशूर यांच्या कुटुंबातील राहुल रणशूर,गौतम रणशूर,अनिकेत रणशूर,मनीषा रणशूर,रेणुका रणशूर,रवींद्र धुळे,मुकेश धुळे,सागर वीर आदींनी याच प्रभागात रहिवासी असलेले इसम राहुल श्रीकांत कालेकर,गायत्री राहुल कालेकर, रेणुका श्रीकांत कालेकर,संगीता श्रीकांत कालेकर,विशाल श्रीकांत कालेकर यांना दिली आहे.

  दरम्यान जितेंद्र रणशूर यांच्या कुटुंबातील एकून आठ व्यक्तींनी कालेकर कुटुंबातील पाच  व्यक्तींना जबर मारहाण केली.मारहाण एवढी जबर होती की,या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रेणुका श्रीकांत कालेकर या युवतीवर कोपरगाव,शिर्डी येथे उपचार होवू शकले नाही. त्यामुळे त्या युवतीला प्रवरानगर येथील पीएमटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

  उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासन त्यांच्या दबावाला जरी बळी पडत असले तरी आम्ही वरिष्ठांकडे दाद मागू.पोलिसांनी सदरच्या घटनेचा नि:पक्षपाती तपास करून हल्ल्याच्या मागे असणारा मास्टर माइंड उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना तात्काळ अटक करावी अन्यथा प्रभागातील नागरीकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईलअसा ईशारा सागर आहेर यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close