गुन्हे विषयक
शेताच्या बांधावरून कोयत्याने मारहाण,सहा जणांवर गुन्हा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेताचे बांध आणि पाणंद रस्ते हे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असतात,जे शेतमाल व यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरत असताना त्यावरून वाद निर्माण झाले तर तहसीलदार किंवा न्यायालयात दाद मागता येत असताना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी हद्दीत शेताच्या बांधावरून दोन कुटुंबात कोयत्यासह हाणामारी होऊन यात सहा जणांवर फिर्यादी महिला परिगाबाई सयराम गुडघे (वय-६०) यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी हद्दीत आज सकाळी ९.३० वाजता गट क्रमांक ७४ मध्ये फिर्यादी महिला परिगाबाई गुडघे या त्यांचा फुटलेला बंद सरळ करत असताना त्यावेळी आरोपी व विठ्ठल बाबुराव दहे हा त्यांच्यावर कोयता घेऊन धावून आला व दादासाहेब विठ्ठल दहे,संदीप विठ्ठल दहे,संदीप विठ्ठल दहे हे तेथे पडलेले बांबू घेऊन फिर्यादीच्या मुलावर धावून त्यांनी त्यास मारहाण केली आहे.
शेताचे बांध आणि पाणंद रस्ते हे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत,जे शेतमाल व यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतात; यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ किंवा ‘बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत पक्के रस्ते बांधले जात आहेत,ज्यात मुरूम-माती मोफत मिळते,१००% यंत्रसामग्री वापरण्यास परवानगी आहे आणि अडथळे आल्यास तहसीलदार न्यायालयात दाद मागता येते,ज्यामुळे शेतीची कामे सुलभ व जलद होतात.मात्र याबाबत अद्याप शेतकऱ्यांत जनजागृती असल्याचे दिसून येत नाही.परिणामी अनेक शेतकऱ्यांत वादाच्या ठिणग्या पडताना दिसत असून त्यातून ते एकमेकाच्या जीवावर उठताना दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी हद्दीत आज सकाळी ९.३० वाजता गट क्रमांक ७४ मध्ये फिर्यादी महिला परिगाबाई गुडघे या त्यांचा फुटलेला बंद सरळ करत असताना त्यावेळी आरोपी विठ्ठल बाबुराव दहे हा त्यांच्यावर कोयता घेऊन धावून आला व दादासाहेब विठ्ठल दहे,संदीप विठ्ठल दहे,संदीप विठ्ठल दहे हे तेथे पडलेले बांबू घेऊन फिर्यादीच्या मुलावर धावून त्यांनी त्यास मारहाण केली आहे.त्याच बरोबर विजय संजय दहे हा त्याठिकाणी पडलेले उसाचे बेणे घेऊन मुलावर धावला होता.त्याच बरोबर फिर्यादीची सुन स्वाती गुडघे ही त्या ठिकाणी झालेले भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिला मोनाली संजय देहे,सुभद्रा विठ्ठल दहे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून यातील विठ्ठल दहे याचे हातातील कोयता फिर्यादी महिला जखमी झाली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पो.हे.कॉ.एस.ए,कुडके आदींनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी आरोपी विठ्ठल दहे यांनीही पहिल्या फिर्यादी महिला परिगाबाई गुडघे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्याबाबत पोलिसांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दुजोरा दिला आहे.त्याबाबत सोनेवाडी आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.१०२ व १०३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२)१८९(२),१९१,(२) १९१(३),१९० प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल एस.ए.कुडके हे करीत आहेत.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



