गुन्हे विषयक
…या शहरात पुन्हा एकदा गोवंश कत्तल,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना देखील संजय नगर येथील आयेशा कॉलनी येथे काटवणात लहान मोठी 13 जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करण्याचे उद्देशाने वरील वर्णनाचा गोवंश जातीचे जनावरे हे निर्दयतेने वागणुक देवुन आखुड दोरीने बांधुन ठेवलेले मिळुन आले आहे.याबाबत पोलिस कर्मचारी प्रवीण अंकुश घुले यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर आणि परिसरातील सर्वच पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते नगरपरिषद निवडणुकीत दंग असताना आज पहाटे ०१.४० वाजण्याचे सुमारास कत्तलीसाठी 13 जनावरे बांधून ठेवली असल्याचे उघड झाली आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी नुसार त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यांना हा प्रकार दिसून आला आहे.मात्र आरोपींना या घटनेचा सुगावा लागला असल्याने त्यांनी धूम ठोकली असल्याचे उघड झाले आहे.यात 13 गोवंश जनावरे जप्त केले आहे.
कोपरगाव शहरात हिंदू संघटनांसह विविध संघटनांचा गोवंश हत्येला मोठा विरोध होऊनही अद्यापही बैल बाजार रोड लगत असलेल्या आयेशा कॉलनी येथे गोवंश हत्या सुरूच असल्याची बाब नुकतीच पुन्हा एकदा या ठिकाणी उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात गोवंश हत्या ही चिंतेची बाब ठरत आली आहे.सन-२०१७ साली ऐन शिवरात्रीच्या दिवशी मोठे गोवंश आणि त्यांची कत्तल केलेले गोवंश आढळून आले होते.त्याचे धागेदोरे संगमनेर म धून थेट गुजरात पर्यंत भिडले होते.त्यामुळे कोपरगाव शहर बदनाम झाले होते.परिणामी राज्यभर खळबळ उडाली होती.वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे सार्वत्रिक समाजमन कलूषित होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.आता सर्वच पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते कोपरगाव निवडणुकीत दंग असताना पुन्हा अशी घटना आज पहाटे ०१.४० वाजण्याचे सुमारास उघड झाली आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी नुसार त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता त्यांना हा प्रकार दिसून आला आहे.मात्र आरोपींना या घटनेचा सुगावा लागला असल्याने त्यांनी धूम ठोकली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे ते आरोपी नेमके कोण याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे,संदीप सोन्ने आदी पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी पोलिसांना १० हजार रुपये किमतीची तांबडी बांडी रंगाची शिंगे असलेली अंदाजे ४ वर्ष वयाची गाय,५ हजार रु.कि.ची काळी बांडी रंगाची शिंगे असलेली अंदाजे २ वर्ष वयाची कालवड,५ हजार रु.किं.ची काळ्या रंगाची बारीक शिंगे असलेली अंदाजे २ वर्ष वयाची कालवड,१० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची अंदाजे ४ वर्ष वयाची गाय ,१० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची होंडी अंदाजे ३ वर्ष वयाची गाय,३,हजार रुपये किंमतीची तांबड्या बांड्या रंगाची अंदाजे १ वर्ष वयाची कालवड,१० हजार रुपये किंमतीची काळे रंगाची अंदाजे ५ वर्ष वयाची शिंगे असलेली गाय,१० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची अंदाजे ३ वर्ष वयाची गाय,१० हजार रुपये किंमतीची तांबड्या रंगाची शिगे असेलली अंदाजे ३ वर्ष वयाची गाय,१० हजार रुपये किंमतीची काळी पांढरी रंगाची अंदाजे ४ वर्ष वयाची होंडी गाय,१०,हजार रुपये किमतीची पांढरे रंगाची शिंगे असलेली अंदाजे ३ वर्ष वयाची गाय,७,हजार रुपये किमतीची पांढ-या रंगाची अंदाजे २ वर्ष वयाची गावराण गाय,१०,हजार रुपये कि.ची एक काळ्या रंगाची शिंगे असलेली अंदाजे ५ वर्ष वयाची गाय असा एकूण तेरा लहान मोठी गोवंश जातीची 01 लाख 10 हजार रुपये किमतीची जनावरे आढळून आली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.५३२/२०२५ महाराष्ट्र प्राणी सरक्षण अधिनीयम १९७६ चे सुधारीत अधिनीयम २०१५चे कलम ५ (ब),९,११ तसेच प्राण्याना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनीयम १९६० चे कलम ३,११ प्रमाणे आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बबन तमनर हे करीत आहेत.



