गुन्हे विषयक
…या गावात कोयत्याने मारहाण,गाड्यांची मोडतोड,अखेर गुन्हा दाखल !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील काल दुपारी झालेल्या हाणामारीचे कारण निष्पन्न झाले असून यातील फिर्यादी इसम याचा मित्र स्वरूप बाबासाहेब कापे याने टाकलेले मटेरियल उचलण्याच्या बदल्यात ५० लाख रुपये न दिल्याने संतप्त झालेले आरोपी चंद्रकांत बाबुराव टेके व त्यांचा मुलगा आदित्य चंद्रकांत टेके यांनी शिवीगाळ करून कोयत्याने हातावर खांद्यावर मारहाण करून त्यांची १० तोळे वजनाची ०३ लाख रुपये किमतीची सोनसाखळी लंपास करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा फिर्यादी विशाल लालजी पटेल (वय-३५) कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दाखल केला आहे.

दरम्यान घटना समजताच घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी धाव घेतली आहे.दरम्यान याच दिवशी वारी गावचा आठवडे बाजार असल्याने घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात जावयाचे दिवस वाईट असल्याचे दिसत असून गत सप्ताहात माहेगाव देशमुख येथे एका जावयास हात आणि पाय मोडेपर्यंत मारहाण झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.त्याबाबत दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असताना कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा जावयाला मराठी म्हणी प्रमाणे खायला (निजेला नव्हे) धोंडा मिळाला असल्याचे दिसून आले आहे.

यातील फिर्यादीचा मित्र स्वरूप कापे याने टेकें या आपल्या नातलगाचे ५० लाख रुपयांची रक्कम दिली नव्हती त्यावरून दोन्ही कुटुंबात फेकझोक सुरू होती.त्यातच स्वरूप कापे हा आपल्या पटेल नावाच्या मित्रासोबत काल दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वारी येथील टेकें वस्तीवर गेला होता.त्यावेळी चंद्रकांत टेके आणि स्वरूप कापे कुटुंबाचा आमना सामना झाला होता.त्यातून हा संघर्ष उद्भवला आहे.
त्याचे झाले असे की,”दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या.दरम्यान टेके वस्ती,वारी शिवार येथे आरोपी चंद्रकांत बाबुराव टेके,(चुलत सासरे) आदित्य चंद्रकांत टेके (चुलत मेहुणे) रा.मुळ रा.वारी ता.कोपरगाव ह.मु.कर्मवीरनगर ता.कोपरगाव यांनी फिर्यादीचा मित्र व सख्या भावाचा जावईबुवा) स्वरुप बाबासाहेब कापे रा.निवारा कोपरगाव याचे आपापसात मटेरियल टाकण्या- उचलण्याचे टेंडर होते.(पण ते कोणते याचा फिर्यादीत उल्लेख नाही) त्यावरून दोघांचे घेणे- देणे चालू होते.मात्र यातील स्वरूप कापे याने आपल्या नातलगाचे ५० लाख रुपयांची रक्कम दिली नव्हती त्यावरून दोन्ही कुटुंबात फेकझोक सुरू होती.त्यातच स्वरूप कापे हा आपल्या पटेल नावाच्या मित्रासोबत काल दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वारी येथील टेकें वस्तीवर गेला होता.त्यावेळी टेके आणि कापे कुटुंबाचा आमना सामना झाला असता चंद्रकांत टेके आणि त्यांचा मुलगा आदित्य टेके बाप लेकांनी,” तु,आमचे शेतात टाकलेले मटेरियल उचलण्याचे बदल्यात ५० लाख का दिले नाही ? असे म्हणुन त्यास वाईट वाईट शिवीगाळ करून कोयत्याने हातावर तसेच खांदयावर मारहान करुन,त्याची १० तोळे वजनाची अंदाजे ०३ ,लाख रुपये किमतीची सोन्याची चैन किंमत अंदाजे ही घेवुन जावुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटना समजताच घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी धाव घेतली आहे.दरम्यान याच दिवशी वारी गावचा आठवडे बाजार असल्याने घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक २३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८(१),११९(१),३५२,३५१(२),(३),३२४(४)(५) प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुंदरडे हे करीत आहेत.