गुन्हे विषयक
…’त्या’ दरोड्यातील आरोपींवर आणखी गुन्हे !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर रात्री काल पहाटे झालेल्या हल्ल्यातील आरोपी नगर पोलिसांनी काल सायंकाळी जेरबंद केले असून संदीप दहाबाड (१८) व जगन काशिनाथ किरकिरे (२५, चौकी.रा.तेलीम्बर पाडा,मोखाडा,ता.पालघर) याना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नजीक असलेल्या पळसे टोलनाका येथून ताब्यात घेतले आहे.त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.दरम्यान या हत्याकांडाने शिर्डीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यांच्यावर अन्य ठिकाणी दोन गुन्हे असल्याची माहिती आहे.

दरम्यान आज रामनवमी असल्याने पोलिस अधिकारी शिर्डी येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात गुंतले असल्याने त्यांना या गुन्ह्याचा तपास करण्यास आज वेळ मिळणार नसल्याचे समजत असून रामनवमी उत्सव संपल्यावर बाकी तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या आरोपींवर यापूर्वी अन्य दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर दिनांक ०५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी पाळत ठेऊन साहेबराव पोपट भोसले यांच्या वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवला होता.त्यात ते स्वतः सह त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच ठार झाले असल्याचे दिसून आले आहे.तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले या गंभीर जखमी झाल्या होत्या.तर त्यांची वृद्ध,अंध आई आश्चर्यकारक बचावल्या होत्या.ही बाब दूध घालण्यास वेळेवर येणारे भोसले कुटुंब आज का आले नाही याचा शोध घेतल्यावर उघड झाली होती.त्यामुळे नगर पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले होते.त्यामुळे घटनास्थळी पोलिस अधीक्षक राकेश ओला,श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,राहाता पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण आदींनी घटनास्थळी तातडीने हालचाल केली होती व आरोपींचा शोध सुरू केला होता.

दरम्यान हे दोन्ही आरोपी हे मका कुट्टी करण्यासाठी भोसले यांच्या नातेवाईकांनी आणले होते.त्यांनी हा गुन्हा घडण्याच्या आधी रोज मुलगा व बाप दूध घालण्यासाठी गावात गेल्यावर पाण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने घराची रेकी केली होती.त्यांचा हा गुन्हा सकाळच्या प्रहरी करण्याचा इरादा होता मात्र त्यांना संधी मिळत नसल्याने त्यांनी पहाटेच्या सुमारास या गुन्ह्यास आकार दिला असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान घटनास्थळावरून चोरट्यांनी एक मोबाईल,दुचाकी आणि महिलांचे लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला असल्याचे उघड झाले होते.त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे गेले असून चोरट्यांनी सिन्नर नजीक असताना चोरून नेलेला मोबाईल सुरू केल्याने त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना कळाला होता.नगर पोलिसांनी सिन्नर पोलिसांना संपर्क करून लागलीच नाकेबंदी लावून आरोपी दागिन्यांसह फरार होत असताना त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.त्यांना अटक करून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडून गुन्हा कबूल केला आहे. व नगर येथील पत्रकारांना त्याबाबत रात्री उशिरा माहिती दिली आहे.त्यां आरोपींची नावे निष्पन्न झाली असून संदीप दहाबाड (१८) व जगन काशिनाथ किरकिरे (२५, चौकी.रा.तेलीम्बरडा, मोखाडा, पालघर) अशी आहेत.
दरम्यान राहाता पोलिसांनी भोसले यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन रात्री काकडी शिवारात दोघा बापलेकांचे रात्री ८.३० वाजेच्या सुमारास काकडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार उरकले असल्याची माहिती मयताच्या जवळच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यावेळी मोठा जनसागर जमा झाला होता.त्यांच्यावर अचानक गुदरलेल्या या हल्ल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान हे दोन्ही आरोपी हे मका कुट्टी करण्यासाठी भोसले यांच्या नातेवाईकांनी आणले होते.त्यांनी हा गुन्हा घडण्याच्या आधी रोज मुलगा व बाप दूध घालण्यासाठी गावात गेल्यावर पाण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने घराची रेकी केली होती.त्यांचा हा गुन्हा सकाळच्या प्रहरी करण्याचा इरादा होता मात्र त्यांना संधी मिळत नसल्याने त्यांनी पहाटेच्या सुमारास या गुन्ह्यास आकार दिला असल्याची माहिती हाती आली आहे.या आरोपींवर नाशिक जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे याआधी दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.