गुन्हे विषयक
…’त्या’ हाणामारीतील चार आरोपी गजाआड !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बेट भागातील मोहिनिराजनगर येथे दिनांक २७ मार्चच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटात तलवार,चाकू,लाकडी दांडे अन्य गंभीर हत्यारांचा राजरोस वापर होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती यातील आरोपी सहा दिवसांनी ०४ आरोपी अटक केले असून त्यात नावे सूरज उर्फ सोन्या कैलास आव्हाड,गस्ती पथकाने रात्री पकडला आहे तर सागर किसन पंडोरे,नितीन संजय हांबरे,अविनाश नामदेव गीते आदी विविध ठिकाणाहून पकडले आहे.त्यांना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर कोर्टात दाखल करण्यात आले असताना त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोपरगाव शहर पोलीस गस्तीवर असताना त्यांनी आरोपींचा शोध सुरू ठेवला होता.त्यातून गजानननगर येथील सूरज उर्फ सोन्या कैलास आव्हाड,गस्ती पथकाने रात्री पकडला आहे तर सागर किसन पंडोरे,नितीन संजय हांबरे,अविनाश नामदेव गीते आदी विविध ठिकाणाहून पकडले आहे.त्यांना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर कोर्टात दाखल करण्यात आले आहे.तर अन्य अकरा आरोपी अद्याप फरार आहे.
कोपरगाव शहरात दिनांक २७ मार्चच्या रात्री अनिल आव्हाड व अतुल आव्हाड यांच्यात किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाला होता.त्यातून कोपरगाव नगरपरिषदेचा माजी सभापती अनिल विनायक आव्हाड यास आरोपी अतुल आव्हाड व त्याचे अन्य दोन साथीदार यांनी दि.२७ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजता घरासमोर येऊन शिवीगाळ,आरडा-ओरडा करत येऊन मागील भांडणाचे कारणावरून त्यांचा साथीदार सुरेश पंडोरे याचे डोक्यात दांडक्याने मारून केली होती.दरम्यान यातील अनिल आव्हाड यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून अनिल आव्हाड यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी शहर पोलिंसात गुन्हा क्रं.-क्रमांक-१६६/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),११५(२),३५२,३५१(२) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तर दुसऱ्या गुन्ह्यातील फिर्यादी गजानननगर येथील होता.त्यात अतुल देविदास आव्हाड (वय-१९) हा फिर्यादी होता.त्याने आपल्या फिर्यादीत म्हंटले होते की,”आपण आरोपी अनिल आव्हाड आणि त्याचे सहकारी यांना म्हणालो की,”माझ्या ओळखीच्या मुलास मारू नका असे म्हणाल्याचा राग येऊन अतुल आव्हाड त्याचा सहकारी आदींना संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून तलवार,बेस बॉल आदींच्या सहाय्याने आपल्या कपाळावर,हातावर पायावर,मारून गंभीर जखमी केले असल्याचा आरोप केला होता.या गुन्ह्यात जवळपास पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल केला होता.मात्र यातील आरोपींनी पोलिसांच्या हाती तुरी दिल्या होत्या.त्या घटनेपासून सहा दिवस पोलिस या आरोपींच्या मागावर होते.मात्र शहर पोलिस अधिकाऱ्यांना या आरोपींचा सुगावा लागला होता.त्यातून त्यांनी गस्तीवर असताना त्यांचा शोध सुरू ठेवला होता.त्यातून गजानननगर येथील सूरज उर्फ सोन्या कैलास आव्हाड,गस्ती पथकाने रात्री पकडला आहे तर सागर किसन पंडोरे,नितीन संजय हांबरे,अविनाश नामदेव गीते आदी विविध ठिकाणाहून पकडले आहे.त्यांना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर कोर्टात दाखल करण्यात आले आहे.त्यांना ०२ दिवसांची म्हणजेच दि.०५ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती चौकशी अधिकारी भूषण हांडोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.