गुन्हे विषयक
आठवड्यात चार जणांचा मृत्यू,पोलिसांत नोंद

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या नैऋत्येस साधारण दीड किमी अंतरावर गोदावरी नदी पात्रात एका तरुणाचा कुजलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळल्यानंतर आज पुन्हा कोपरगाव तालुक्यात सोनारी येथे एका बेचाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याचे नाव छबू धोंडीबा पिंगळे असे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.एका आठवड्यात कोपरगाव तालुक्यात चार अकस्मात मृत्यूंची नोंद झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मयत छबू धोंडीबा पिंगळे हे मूळ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील असून त्याच्या गावाचे नाव सोमठाणे असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी दिली आहे.मात्र त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजू शकले नाही.
कोपरगाव तालुक्यात अकस्मात मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना चार दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या नैऋत्येस साधारण दीड किमी अंतरावर गोदावरी नदी पात्रात सकाळी १० वाजेपुर्वी एका ३०-३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली होती तर त्या आधी २३ मार्च च्या दरम्यान नाशिक जलसंपदा विभागाच्या गोदावरी डाव्या कालव्यातील पाण्यात कोपरगाव तालुक्यातील बोलकी शिवारात एक अंदाजे ५०-५५ वयाचे व मजबूत बांधा असलेल्या पुरुष जातीचे प्रेत वाहत आले होते.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
या शिवाय आणखी एक घटना संवत्सर शिवारात उघड झाली होती.यात मयत सागर ज्ञानेश्वर सोनवणे (वय -३८) हा खीर्डी गणेश शिवारात रेल्वे लाईन कि.मि.४६६/११ ते ४६६/१३ दरम्यान मृत आढळून आला होता आता एक आठवड्याच्या आत चौथी घटना उघड झाली असून यातील मयत हा तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत हद्दीत मृत आढळून आला आहे.त्याला उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्याचे नाव छबू धोंडीराम पिंगळे असे असून त्याचे वय ४२ वर्षे आहे.तो मूळ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील असून त्याच्या गावाचे नाव सोमठाणे असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी दिली आहे.मात्र त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजू शकले नाही.याबाबत सोनारी आणि परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.उल्हारे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक अनुक्रमे -२३/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कूसारे हे करीत आहेत.