गुन्हे विषयक
शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी,दोन जखमी,कोपरगाव बंद !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरातील नवीन आय.टी.आय.इमारतीसमोर काल सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश दत्तात्रय मोरे हे करत असताना तेथून काही तरुण आपल्या दुचाकीवरून जात होते.त्यांना सदर रस्त्यावरून जाण्यास हरकत घेतल्यावरून झालेल्या दोन गटात तुंबळ हाणामारीत दोन जण जखमी झाले असून या प्रकरणी गांधीनगर येथील आरोपी अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण,मजीद रशीद पठाण व अन्य चार ते पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी योगेश दत्तात्रय मोरे यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली असून आज विविध संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे.

दरम्यान या ठिकाणी घटनेची माहिती राष्ट्रवादीचे(अजित पवार) जिल्हा कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा आढाव,अमोल भोकरे,संकेत वाणी आदी तीन जाणं हे घटनास्थळी आले व त्यांनी सदर भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही आपल्या हातातील शस्त्राने जोरदार प्रसाद दिला आहे.
कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था तोळा मासा शिल्लक राहिली असल्याचे दिसत असून एखाद्या दिवशी याची मोठी किमंत शहरास चुकवावी लागणार असे दिसू लागले आहे.शहरात वारंवार गोवंश बंदी असताना त्याचे राजरोस उल्लंघन होत आहे.हिंदू संघटनांनी वारंवार इशारे देऊनही त्याकडे विशिष्ठ समाज आणि पोलिस डोळेझाक करत आहे.परिणामी शहरात मोठा संताप व्यक्त होत आहे.वाळूचोरांची शिरजोरी त्यांच्याकडील गावठी कट्टे या बाबी आधीच चिंता निर्माण करणाऱ्या आहे.अशातच गुन्हेगारी वाढत असताना शहरातील विशिष्ट समाजातील सडक छाप तरुण कायदा सुव्यवस्था डोक्याला बांधून राजरोस फिरताना दिसत आहे.त्यामुळे घराबाहेर पडलेला माणूस,महिला,तरुणी सुरक्षित घरी येईल की नाही अशी शहरातील स्थिती नाजूक झाली आहे.अशीच धक्कादायक घटना कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण अडीच कि.मी.असलेल्या नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीजवळ काल सायंकाळी ५.३० वाजेच्यां सुमारास घडली आहे.तेथे कोपरगाव नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश मोरे यांनी घेतले होते.

दरम्यान नजिक एका भंगाराच्या दुकानात आग लागली होती.ती कोणी लावली हे समजू शकले नाही.मात्र नगरपरिषदेचे अग्निबंबानी ती ताबडतोब विझवली आहे.या घटनेचा व हाणामारीच्या घटनेचा काही संबंध आहे का नाही हे समजू शकले नाही.
सदरच्या कामावर अंतिम हात मारण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी आपल्या दुचाकीवरून काही तरुण जात होते.त्यांना संबधित ठेकेदार यांनी हरकत घेऊन “सदरचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे,तुम्ही दुसरीकडून जा” असे सांगितल्याचा राग येवून त्यांनी ठेकेदार योगेश मोरे आणि त्यांचे बंधू ,पुतण्या आदींना गज,लाकडी दांडे,दगड आदींच्या सहाय्याने शिवीगाळ करत जोरदार हल्ला चढवला होता.घटनास्थळी नजीकच्या नागरिकांनी धाव घेऊन सदरचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता तो फोल ठरला आहे.दरम्यान या घटनेत फिर्यादी योगेश मोरे सह त्यांचे बंधू गणेश मोरे,पुतण्या पवन मोरे आदी तीन जण जखमी झाले असल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे.तर पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली असून बाकी अद्याप फरार आहेत.
दरम्यान या ठिकाणी घटनेची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा आढाव,अमोल भोकरे,संकेत वाणी आदी तीन जाणं हे घटनास्थळी आले व त्यांनी सदर भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही आपल्या हातातील शस्त्राने जोरदार प्रसाद दिला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
याच दरम्यान नजिक एका भंगाराच्या दुकानात आग लागली होती.ती कोणी लावली हे समजू शकले नाही.मात्र नगरपरिषदेचे अग्निबंबानी ती ताबडतोब विझवली आहे.या घटनेचा व हाणामारीच्या घटनेचा काही संबंध आहे का नाही हे समजू शकले नाही.वर्तमानात परिस्थिती शांत असून आज विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी शहर बंदचा नारा दिला आहे.व्यापारी महासंघाचे याबाबत सकाळी ९.३० वाजता बैठक बोलावली आहे.त्यानंतर कोपरगाव बंद बाबत खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५५९/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),(२)११५(२),३५२,१८९(२),१९१(२),(३)१९०,सह फौजदारी दुरुस्ती कायदा कमल ७ प्रमाणे आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शिर्डी येथील विभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी भेट दिली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे हे करीत आहेत.