जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…’त्या’ दरोड्यातील गुन्हेगार सराईत,कोपरगाव शहरात अनेक गुन्हे ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर तीन दिवसापूर्वी २१ जानेवारी रोजी चार दरोडेखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींवर कोपरगाव शहरात अनेक गुन्हे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यात एक महिन्यापूर्वी नंग्या तलवारीने एका तरुणीच्या पित्याला धमकावले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

कोपरगाव जब्रेश्वर मंदिरासमोर रेशन घोटाळ्यात असलेल्या दोन टोळ्यांनी एकमेकांविरुद्ध गोळीबार करून पोलिसांची दाणादाण उडवून दिली होती पण हे शहर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदी नजिक घडल्याने पोलिसांची इभ्रत या चोरट्यांनी ऐरणीवर आणली होती.याच गोळीबारात अटक झालेले आरोपी आणि पोहेगाव दरोडा गुन्ह्यातील आरोपी यांचा जवळचा संबंध असल्याचे आता बाहेर येऊ लागले आहे.

   कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे २१ जानेवारीला सायंकाळी ५.४५ वाजता दिवसाउजेडी नंग्या तलवारी,कत्ती,एअर गण हाती घेऊन दरोडा टाकला होता.मात्र नागरिकांच्या सजगतेमुळे तो ऐनवेळी फसला आणि सुवर्णकार ज्ञानेश्वर माळवे यांचा ऐवज दैव बलवत्तर म्हणून हाती घेऊन जाता जाता वाचला आहे.मात्र सदर आरोपी मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे.
या गुन्ह्यात आता पर्यंत जैदखान अमजदखान पठाण रा.संजयनगर व नितेश फकिरा भालेराव रा.सुभाषनगर या दोघांसह आदित्य बागुल व दुसरा फराज सय्यद यांना जनतेचा मोठा प्रसाद मिळाल्यावर दिगंबर अवस्थेत ताब्यात घेतले होते.केवळ पोलीस वेळेत हजर झाले म्हणून ते वाचले होते.मात्र त्यांच्या लीला आता एकेक उजेडात येऊ लागल्या आहेत.

दरम्यान काही दिवसापूर्वी पोहेगाव ते देर्डे-कोऱ्हाळे रत्यावर खडकीनजिक असलेल्या समृध्दी महामार्गाच्या पुलाच्या खाली दुपारी १२ वाजेच्या सुमारास येवला येथील प्लास्टिक च्या व्यापाऱ्याची गावठी कट्टा दाखवून १२-१५ हजारांची लूट झाली होती ती या टोळीने केली असल्याचा कयास व्यक्त होत आहे.तर
विधानसभा निवडणूक पूर्व कोपरगाव जब्रेश्वर मंदिरासमोर रेशन घोटाळ्यात असलेल्या दोन टोळ्यांनी एकमेकांविरुद्ध गोळीबार करून पोलिसांची दाणादाण उडवून दिली होती पण हे शहर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदी नजिक घडल्याने पोलिसांची इभ्रत या चोरट्यांनी ऐरणीवर आणली होती.याच गोळीबारात अटक झालेले आरोपी आणि पोहेगाव दरोडा गुन्ह्यातील आरोपी यांचा जवळचा संबंध असल्याचे आता बाहेर येऊ लागले आहे.पहिल्या गोळीबारात अटक आरोपी जामिनावर सुटल्यावर त्यांचे नवीन नगरपरिषद इमारतीच्या उत्तरेस पोस्टाच्या वायव्य कोपऱ्यावर याच विद्वानांनी केक कापून त्यांचे विर पुरूषासारखे शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून जंगी स्वागत (उदात्तीकरण) केले होते.

  एवढेच नाही काही अल्पबचत महिलांचे पैसे या दरोडेखोरांनी लंपास केल्याच्या बातम्या समोर येत आहे.मात्र महिला या टग्यांच्या दहशतीने समोर यायला तयार नसल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे या गुन्हेगारीची पाळेमुळे शोधून नष्ट करण्याचे आव्हान शिर्डी आणि कोपरगाव विशेषतः शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने व विद्यमान लोकप्रतिनिधी आ.आशुतोष काळे यांचेसमोर उभे ठाकले आहे.आता पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close