गुन्हे विषयक
लोखंडी रॉडने मारहाण,तीन जखमी,एकमेकांविरुद्ध गुन्हा
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दत्तनगर येथील रहिवासी असलेला फिर्यादी शादाब मुसा शेख यास त्याचे नातेवाईक आरोपी अरबाज रमजान पठाण रा.सावळीविहीर व साहिल वसीम मेमान रा.दत्तनगर यांनी आरोपींच्या बहिणीच्या मागील भांडणाच्या कारणावरून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास लोखंडी रॉड व आपल्या हातातील टोकदार वस्तूने डोक्यात,मानेवर,पायावर मारहाण करत,शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे दत्तनगर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान यात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल केले असून तीन जण जखमी झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी व आरोपी हे एकमेकाचे नातेवाईक आहेत.त्यांच्यात मागील काही दिवसांत बहिणीबरोबर भांडण झाले होते.त्याचा राग मनात धरून आरोपी अरबाज पठाण याने दि. ०७ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दत्तनगर गणपती मंदिराचे जवळ जावून आपल्या हातातील रॉडने तर आरोपी साहिल मेमाण याने आपल्या हातातील टोकदार वस्तुने भाजीपाला विक्रेता फिर्यादी शादाब शेख याचे डोक्यात,मानेवर,पायावर गंभीर मारहाण करत जखमी केले आहे.शिवाय शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,पो.हे. कॉ.कोरेकर आदींनी भेट दिली आहे.
याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंद क्रमांक ०७ व ०८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१),१५(२),३५२,३५१,(२) प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.