जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गावठी कट्ट्याची धमकी,चार जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात धारणगाव रोडवर मागील भांडणाचे कारणावरून काल सायंकाळी पाच वाजता गाडीतून येऊन श्रीरामपूर येथील आरोपी शाहरुख रज्जाक शेख,तौफिक सत्तार,जान महंमद मेमन,तन्वीर रंगरेज रा.संजयनगर,कोपरगाव आदींनी गांधीनगर कोपरगाव येथील फिर्यादी नाजिम इस्लौद्दिन शेख (वय -26)यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून शाहरुख शेख याने त्यास गावठी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर वरील आरोपी शाहरुख रज्जाक शेख,तौफिक सत्तार,जान महंमद मेमन,तन्वीर रंगरेज आदीनी फिर्यादी नाजीम शेख यास मागील भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून शाहरुख शेख याने त्यास गावठी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.व फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने चोरून नेली आहे.

   कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यात सोमवार दिनांक 09 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धारणगाव रोडवर वरील आरोपी शाहरुख रज्जाक शेख,तौफिक सत्तार,जान महंमद मेमन,तन्वीर रंगरेज रा.संजयनगर,कोपरगाव आदी आपल्या चार चाकी गाडीतून आले व त्यांनी फिर्यादी नाजीम शेख यास मागील भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून शाहरुख शेख याने त्यास गावठी कट्टा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.व फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने काढून नेली आहे.त्यामुळे या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.392/2024 भारतीय दंड संहिता सन- 2023 चे कलम 119(1),115,(2),352,351(2),3(5),अवैध शस्त्र अधिनियम कलम 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक एस.सी.पवार यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close