गुन्हे विषयक
गणेश उत्सवात पशू हत्या,गणेश विसर्जन लांबविण्याचा इशारा !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतानाही त्याला पायदळी तूडविण्याचे काम राजरोस सुरू असून पोलिसांना वाकुल्या दाखविणारा संजयनगर कोपरगाव येथील रहिवासी असलेला आरोपी अरबाज मस्जिद शेख (वय -24)याचेवर आज दुपारी तीन वाजता कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने गोवंश कायद्याची ऐशी तैशी करणाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तर ही पशुहत्या थांबविली नाही तर गणेश विसर्जन लांबविले जाईल असा इशारा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्रात नऊ वर्षा पूर्वी भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला होता.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.तोपासून ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्या गुन्हेगाराला कठोर शिक्षाही होण्याची तरतूद आहे.गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते.मात्र भाजप महायुतीच्या राज्यात या घटनांत कमी येताना दिसत नाही.उलट या असामाजिक तत्त्वांचे मनोबल वाढताना दिसत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.कोपरगाव शहरातील गोरक्षक समितीचे अध्यक्ष मयूर विधाटे याचे घरावर स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्ट रोजी शहरातील सुमारे 150- 200 असामाजिक तत्वांनी हल्ला चढवला ही घटना त्याची प्रचिती मानले जात आहे.अशीच घटना नुकतीच पुन्हा एकदा उघड झाली असून त्यात पुन्हा एकदा वरील आरोपी अरबाज कुरेशी याने हा गुन्हा केला असल्याचे दिसून आले आहे.संजयनगर भागात अनेक वर्षे ही हत्या सुरू आहे.पोलिसांना हे असामाजिक तत्व दाद देत नाही हे अनेक वेळा उघड आले आहे.या मागे काय कारण आहे हे समजायला मार्ग नाही.
दरम्यान यात आरोपीने आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकप क्रमांक एम.एच.15 एफ.व्ही.1950)हिच्या साहाय्याने सोमवार दिनांक 09 सप्टेंबर रोजी दुपारी 3.08 वाजता शिंगणापूर ते संवत्सर या मार्गावर रेल्वे बोगद्याजवळ गोवश वाहतूक करताना आधलून आला आहे.त्याने अवैध गोवंश वाहतूक करताना गाडीत कुठलीही चटई न टाकता,प्राण्यांची वाहतूक असा फलक न लावता,गोवंश जनावरे अत्यंत निर्दयीपणे वाहतूक करताना अधलून आला आहे.
दरम्यान त्यात त्याने 02 लाख 10 हजार किंमतीची गोवंश जनावरे,03 लाख रुपये किमतीची महिंद्रा पीकप,असा सुमारे 05 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.व आरोपीवर कोपरगाव शहर पोलिस फिर्यादी पो.को.सतिष शिवाजी काठे (वय -36)ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.389/२०२४ भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधिनियम 1976 चे कलम ११(१)(ड)ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम कलम १९९५चे कलम ५(ब) ९ प्रमाणे दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह पो.हे. कॉ.जे.पी.तमनर यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस हे.कॉ.तमनर हे करत आहेत.
दरम्यान या प्रश्न गंभीर बनला असून यावर कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी इशारा दिला असून त्यात त्यांनी म्हंटले आहे की,”कोपरगाव नगरपरिषदेने आपल्या कार्यकाळात मनाई वस्ती या ठिकाणी कत्तलखाना बांधला असताना कसाई त्याचा वापर न करता अवैधपणे संजयनगर परिसरात अवैधपणे गोवंश जनावरांची कत्तल करत आहे.अनेक आंदोलने करूनही त्यावर काही परिणाम झालेला नाही उलट गोवंश हत्या बंदी करणाऱ्या कार्यकर्त्यावर हल्ले करण्यापर्यंत ही मजल गेली आहे.ही गंभीर बाब असून आगामी काळात प्रशासनाने यावर प्रतिबंध केला नाही तर आगामी काळात होणारे गणेश विसर्जन लांबणीवर टाकावे लागेल असा इशारा दिला आहे.त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.