जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा विनयभंग तरी गुन्ह्यात नोंद नाही,तक्रार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथील गुन्ह्यात आरोपींच्या आपला विनयभंग केला असताना कोपरगाव तालुका पोलिसांनी वाळूचोर आरोपींना अभय देण्याच्या उद्देशाने सदर गुन्ह्याचे कलम लावले नसून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लावावे अशी मागणी मळेगाव थंडी येथील फिर्यादीने व बाधित महिलेने तालुका पोलिसांकडे केली आहे.त्यामुळे मळेगाव थडी परिसरात खळबळ उडाली आहे.

   

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी तरुणाने व त्याच्या आईने मारहाण व विनयभंग याची तक्रार दिली असताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही व केवळ मारहाणीचा व जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना मदत होईल असे वर्तन केले असल्याचा आरोप केला आहे.

   कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दि.०३ जून रोजी वाळूचोरीची माहिती कोपरगाव तहसील आणि अधिकाऱ्यांना देतात या संशयावरून मालेगाव येथून आपल्या कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी येथे घरी जाणाऱ्या एक फिर्यादी तरुणाला रस्त्यात अडवून दि.०३ मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास रवंदा चौकात यांच्या ओळखीचे आरोपी व त्याचे काही अनोळखी सहकारी उभे होते.त्यांनी फिर्यादी तरुणाला हाक मारली व बोलवून घेतले होते.व “तुझ्या आई वडिलांना फोन कर व बोलावून घे” अस सांगीतले होते.त्यानुसार आपण आपल्या आई वडिलांना बोलावून घेतले होते.व त्यांना शिवीगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण वजीवे मारण्याची धमकी दिली होती.व सदर तरुणाच्या आईलाही मारहाण करून तिची साडी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचा आरोप केला होता.
   या प्रकरणी आपण तशी माहिती फिर्यादी तरुणाने व सदर महिलेने पोलिसांना दिली होती.मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही व आरोपींना मदत होईल असे वर्तन केले असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी सदर महिलेने आपला जबाब वाचूनच सही केली असेल मात्र तरीही त्यांना अन्य जबाब नोंदवायचा असेल तर आपण त्याची दखल घेऊ अशी माहिती दिली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्र.२१४/२०२४ भा.द.वि.कलम.१४३,३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला होता.मात्र यात सदर महिलेचा विनयभंग केला असताना त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही असा या महिलेचा आरोप आहे.परिणामस्वरूप या गुन्ह्यात कलम वाढविण्याची मागणी नोंदवली नाही असा आरोप सदर बाधित महिलेने लेखी अर्जाद्वारे नुकताच केला आहे.त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधीकारी काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close