जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तिघांचा मृत्यू,पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद,खळबळ !

जाहिरात-9423439946

 

   न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  कोपरगाव शहर आणि तालुक्यात उन्हाने कहर केला असून उष्म्याचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत असून यातून अनेक अनर्थ उघड होत असून यातून तीन इसमांचा मृत्यू झाला असल्याचा कयास व्यक्त होत आहे.यात साधारण ६०-६५ वर्ष वयाचे दोन व एक ५० वर्षाच्या पुरुषांचा समावेश आहे.यात पहिली खबर शीतल प्रकाश पहाडे यांनी दिली असून दुसरी खबर अमित साहेबराव खोकले यांनी दिली आहे.तर तिसरी नोंद पोलिसांनी केली असून यातील तिघांची अद्याप ओळख पटलेली नाही.

 

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित नाईकवाडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी उष्माघाताच्या प्रकाराचा इन्कार केला असून शहरात विविध दिवशी घडलेल्या तीन घटनांपैकी एक भूकबळी तर दोन हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती दिली आहे.

   भारतातील मार्च-मे दरम्यान उन्हाळा अधिक उष्ण असण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली होती. तीन महिन्यांच्या कालावधीत देशातील बहुतांश भागांमध्ये “सामान्यतेपेक्षा जास्त” कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज वर्तवला आहे.वर्तमानात अरब राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर उष्ण लाटा आल्याने त्याचे प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.दोन दिवसात पूर्वेकडे वाहणारा वारा सुरू झाल्याने हवेतील उष्णता कमी झाल्याचा आभास होत असला तरी वर्तमान तापमान सजीव सृष्टीस भाजून काढत आहे.त्यामुळे उष्माघाताने मृत्यू दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.अशाच तीन घटना कोपरगाव तालुक्यात उघड झाल्या आहेत.

   यातील पहिली घटना ही शहरातील एच.डी.एफ.सी.बॅंकेजवळ जाधव हॉस्पिटलचे मागील भिंतीचे बाजूस जवळ घडली आहे.यातील मयत इसम हा अंदाजे ६०-६५ वर्षाचा आहे.तो मृत अवस्थेत आढळून आला आहे.त्याची खबर शीतल पहाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

तर दुसरी घटना ही नगर-मनमाड मार्गावर आत्मा मलिक हॉस्पिटल समोर घडली आहे.या घटनेची खबर रुग्णवाहिका चालक अमीत साहेबराव खोकले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.तर तिसरी घटना ही नगर मनमाड रोडवर असलेल्या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाच्या खाली घडली आहे.या तिन्ही घटना स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,पो.हे.कॉ.अर्जुन दारकुंडे,डी.आर.तिकोने,आर.पी.पुंड आदींनी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रं.४० व ४१/२०२४ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.अर्जुन दारकुंडे व डी.आर.तिकोणे,आर.पी.पुंड आदी करीत आहेत.

  दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित नाईकवाडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी उष्माघाताच्या प्रकाराचा इन्कार केला असून शहरात विविध दिवशी घडलेल्या तीन घटनांपैकी एक भूकबळी तर दोन हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close