जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महसुल विभागात अनागोंदी कारभार,कर्मचाऱ्यांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नाकाखाली असललेल्या कोपरगाव तालुक्यात धक्कादायक घटना उघड झाली असून महसुली विभागात कार्यरत असलेला नियमबाह्य पर्यवेक्षक राहुल साहेबराव शिरसाठ याने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे वितरित करण्यात येणारे मानधन परस्पर असंबंधीत नावे दाखवून परस्पर हडप केले असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली असून या प्रकरणी शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयातील नायब तहसीलदार विलास बबन राव भांबरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान हि ०६ लाख रुपयांच्या अफरातफरीची घटना घडून १३ दिवस घडूनही पोलीस आणि महसूल प्रशासनने हि घटना दडवून ठेवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.या घटनेचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.या संबंधी जबाबदार महसुली अधिकारी नेमके काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारने १९६२ साली के.संथानम यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमली होती.या समितीने भ्रष्टाचाराचे स्वरूप निराळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे.या समितीच्या मते,सरकारी कर्मचारी आर्थिक व अन्य स्वरूपाचा फायदा करून घेण्याच्या पारंपरिक भ्रष्ट मार्गाव्यतिरिक्त इतर स्वरूपाचाही भ्रष्टाचार करतात.तो म्हणजे कमी दर्जाची सेवा देणे,खोटे भत्ते स्वीकारणे,खोट्या पावत्या सादर करणे,सरकारी यंत्रणेचा खासगी कारणांसाठी वापर करणे आदी.थोडक्यात आधुनिक काळात भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढली आहे.त्यातले त्यात भ्रष्टाचारात महसुल आणि त्या पाठोपाठ पोलीस खात्याचा हात कोणी धरणार नाही.दर वर्षी जाहीर होणाऱ्या राष्ट्रीय आकडेवारीत यांचा क्रमांक हमखास वाचावयास भेटतो.

   दरम्यान प्रशासकीय कार्यकालीन कामकाज पद्धती ही वेळकाढू,दीर्घ मुदतीची आणि गुंतागुंतीची असते.यामुळे नागरिक लाच देऊन लवकर कामे करवून घेण्यात येतात.राज्य आणि प्रशासनाच्या कार्याची व्याप्ती आधुनिक काळात वाढलेली आहे. नागरिकांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांची अडवणूक करून अतिरिक्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न प्रशासकीय कर्मचारी करतात.राजकीय नेते,प्रशासकीय अधिकारी,हितसंबंधी यांच्यातील लागेबांध्यामुळे सर्व प्रशासकीय प्रक्रिया भ्रष्ट होतात.वर उल्लेखलेल्या कारणांव्यतिरिक्त मानवी स्वभाव आणि प्रवृत्ती हे भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तहसील कार्यायात उघड झाली आहे.
गत वर्षी जून ते नोव्हेंबर दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या.त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रस्तरीय अधिकारी नेमले होते.व त्या २५ केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांचे सुमारे ०६ लाख रुपयांचे मानधन देण्यासाठी मानधन यातील निवडणूक शाखेत काम करणारा पर्यवेक्षक राहुल साहेबराव शिरसाठ यांची नेमणूक करण्यात आली होती.त्याने बँक खात्यावर सदर रक्कम जमा करण्यासाठी बनावट नावाने पर्यवेक्षक तयार करुन त्यांच्या नावावर सुमारे २४ हजार रूपयांची बनावट बिले वर्ग केली होती.त्यात भास्कर बबन नजन यांचे नावावर तीन वेळा,श्रीमती अर्चना मिननाथ पठारे यांचे नावावर दोन वेळा,या प्रमाणे २५ व्यकतींच्या नावावर हि रक्कम अडा केली असल्याचे आढळून आले आहे.हे पर्यवेक्षण लोकसेवकामधून नियुक्त केले जात असताना या महाशयांनी ते खाजगी व्यक्तीतून निवडले होते हे विशेष ! विशेष म्हणजे त्यांची नियुक्ती केली असल्याचे आढळून आले नाही.हि बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्याने कार्यालयीन खर्च,निवडणुका खर्च,उपप्रधान खर्च आदींच्या नावावर हि रक्कम कोषागारात जमा केली असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे त्याचे विरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.दरम्यान त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी नुकताच दि.२० मार्च रोजी गु.क्रं. १३८/२०२४ भा.द.वि.कलम ४०९,४२०,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हे करत आहेत.

  

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close