गुन्हे विषयक
रस्ते अपघातात एक तरुण ठार,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर नुकताच एक अपघात झाला असून यातअज्ञात वाहनास मागील बाजूने धडक दिल्याने या अपघातात धारावी,मुंबई येथील तरुण खलील इस्माईल शेख (वय-३१) हा तरुण आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी एस.प्रेसो व्ही.एक्स.आय.(क्रं.एम.एच.०१ ई.ई.३६५४) हि अविचाराने चालवून आपल्या मृत्युस कारणीभूत झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्तमानात समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे.सदर अपघात रोखण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने चालकास निद्रानाष व्हावा तंद्री लागू नये,मेंदू निद्रिस्त होऊ नये यासाठी लक्ष वेधुन घेण्यासाठी नानाविध उपक्रम राबवून सदर अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले असले तरी यात त्यांना अपेक्षित यश येताना दिसत नाही.त्यामुळे अनेक नागरिकांना,प्रवाशांना,चालकांना आपले जीव हकनाक गमवावे लागत आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात धारावी,मुंबई येथील फिर्यादी व ट्रॅव्हल व्यावसायिक हसनेन अक्रम खान (वय-३३)यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”मयत तरुण खलील शेख हा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी एस.प्रेसो व्ही.एक्स.आय.(क्रं.एम.एच.०१ ई.ई.३६५४) हि मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर चांदेकसारे शिवारात कि.मी.५२५ नजीक निष्काळजी पणाने व भरधाव वेगाने चालवून तो रोडवर समोर चालणारे वाहनास पाठीमागून जोराची धडक देऊन स्वतःचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे.या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यू नोंद (क्रं.१४/ २०२४ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली होती.मात्र चौकशीत सदर मृत्यू हा अपघाताने झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी काल ११८/२०२४ भा.द.वि.कलम २७९ ३०४(अ),४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महेश साहेबराव देशमुख यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा २१६/२०२४ भा.द.वि.४५७,३८० प्रमाणे दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक महेश कुसारे हे करत आहेत.