जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिला सरपंचाच्या घरावर हल्ला ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील सरपंचाच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १५ जणांच्या टोळक्याने घरी येऊन अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र याबाबत गावातील यात्रेत डी.जे.लावण्यावरून हे वादंग निर्माण झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून नाराज तरुणांनी हे कृत्य केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

  

“यात्रोत्सवाचे फ्लेक्स बोर्ड फाडणे,मध्यरात्रीला महिला सरपंच यांच्या घरी १० ते १५ समाजकंटक जाऊन यात्रा उत्सवातील समस्या राहिल्याचे कारण सांगून अश्लील भाषा वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी देतात तसेच गावाचा व मोठेबाबा यात्त्रोत्सावाचा शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकावर वेळीच बंधन घातले नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो”-कांचन राऊत,पोलीस पाटील,कोळगाव थडी,ता.कोपरगाव.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी या ठिकाणी मोठे बाबा मच्छिंद्रनाथ हे प्राचीन देवस्थान असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठेबाबा यात्रौत्सव जातिय सलोखा ठेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी झाली होती.तथापि काही गावातील असामाजिक तत्त्वांनी मध्यरात्रीला सरपंचांच्या घरी जाऊन यात्रा उत्सवात,” मध्ये बॅंजो लावला नाही,मोठेबाबा मंदिराची  चांगली स्वच्छता केली नाही”असा आरोप करत मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते पंधरा समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत महिला सरपंचाच्या घरी जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी मोठमोठ्याने ओरडून शिवराळ व अश्लील भाषेत दमबाजी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या बाबत गवळी म्हणाल्या की,”यात्राउ त्सव समितीत आपले पती चंद्रशेखर गवळी हे खजिनदार आहे.म्हणून यांचे अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की केली व “तू,यात्रा उत्सव समितीचा खजिनदार आहे; तुला समजले नाही का बॅंजो लावायचा आम्हाला नाचायचं आहे,तुझी बायको लय शायनिंग मारते”  या गोष्टी महागात पडतील असे उद्गार काढल्याची माहिती हाती आली आहे.
   दरम्यान गावाचा व यात्रा उत्सवाचा शांतता भंग करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करावी मोठे बाबा यात्रा उत्सव वाचे समितीचे व देवस्थानचे फ्लेक्स बोर्ड वाढून त्यांची विटंबना करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान महिला सरपंच मीनल गवळी यांनी म्हटले आहे की,”आमच्या जीविताला धोका असून तसेच आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळणे गरजेचे आहे”


   दरम्यान घटनास्थळी कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे,सहाय्यक फौजदार गजानन वांढेकर,पोलिस नाईक किसन सानप आदिंनी घटनस्थळी भेट दिली असून समाज कंटकावर कडक कारवाई करण्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले असून गावांमध्ये तणावपूर्ण शांतता असून गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने पोलीस सूत्रांशी या बाबत चर्चा केली असता त्यांनी हा विषय मोठा नसून काही सामाजिक तत्त्वांनी यात्रा उत्सवात डी.जे.न लावल्याने हा गोंधळ घातला असल्याची कबुली दिली असून या बाबत गंभीर दखल घेऊन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान यात्रोत्सवाचे फ्लेक्स बोर्ड फाडणे,मध्यरात्रीला महिला सरपंच यांच्या घरी १० ते १५ समाजकंटक जाऊन यात्रा उत्सवातील समस्याचे राहिल्याचे कारण सांगून अश्लील भाषा वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी देतात तसेच गावाचा व मोठेबाबा यात्त्रोत्सावाचा शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकावर वेळीच बंधने घातले नाही तर ते उद्या कायदा हातात घेऊन मोठा गुन्हा घडवू शकतात ही शक्यता नाकारता येत नसल्याने या समाज कंटकावर  कडक कारवाई करण्यात यावी” अशी मागणी कोळगाव थडी येथील पोलीस पाटील कांचन राऊत यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close