गुन्हे विषयक
विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न! कोपरगावात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात असलेल्या संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व होमिओपॅथी महाविद्यालयातील प्राचार्य सावनी समीर यारनाळकर (वय-४४) त्यांचा सहकारी अस्लम झाकीर नदाफ (वय-२९) दोघे रा.जयसिंपुर ता.शिरोळ जि.कोल्हापूर आदींनी महाविद्यालयाच्या ओसरीत हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास सांगून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी फिर्यादी संस्थाचालक चांगदेव नारायण कातकडे (वय-६१) रा.कोपरगाव बेट यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”नमाज अदा करणे हा गुन्हा नाही;पण तुमच्या घराच्या चार भिंतींच्या आत किंवा तुमच्या मशिदीच्या चार भिंतींच्या आत किंवा परवानगी मिळालेल्या नियुक्त मोकळ्या जागेत नमाज अदा करणे उत्तम आहे.प्रार्थनेचा मूलभूत निकष म्हणजे तुमच्या देवतेवर केंद्रित असलेली एकाग्रता,ज्यासाठी शांत,स्वच्छ आणि शांत जागेची शिफारस केली जाते.रस्ते व उद्याने,महाविद्यालये हि काही नमाज अदा करण्याची ठिकाणे नाही.मशिदीत नमाज विरोधात काहीही नाही.गजबजलेल्या रस्त्यावर जड वाहतूक रोखून,किंवा महाविद्यालयात जर हिंदू विद्यार्थ्यांना जर नमाज अदा करण्यास भाग पाडले जात असेल तर ती केवळ बेकायदेशीरच नाही तर अनैतिकही आहे.संपूर्ण समाजाला त्रास देणे हि कृती नक्कीच निषेधार्ह मानली पाहिजे.वर्तमानात काही असामाजिक तत्व यास हरताळ फासताना दिसत आहे हे कधी रेल्वेत तर कधी रस्ता बंद करून या अनैतिक कृती करून सामान्य जनमाणसास चिथावणी देण्याचे कृत्य करत असल्याचे या देशात वारंवार दिसून येत आहे.दरम्यान यात जर एखाद्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक असतील तर ? हा विषय आणखी गंभिर मानला पाहिजे.आणि त्यातही मुस्लिम प्राध्यापकांने जर हिंदू विद्यार्थ्यास महाविद्यालयातच जर नमाज पठण करण्यास लावले तर ते निश्चितच निषेधार्ह माणून त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.अशीच घटना नूकतीच कोपरगाव बेटानजीक पूर्वेस कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पिटल आणि होमिओपॅथी महाविद्यालयात घडली असल्याने कहर उडाला आहे.मात्र हि घटना तब्बल दीड वर्षांपूर्वी घडली होती.मात्र ती आता उघड झाली असून त्यामुळे हा गुन्हा दाखल व्हायला एवढा उशीर का झाला ? असा प्रश्न सामान्य नागरिक महाविद्यालय आणि त्यांच्या प्रशासनास विचारीत आहेत.याचा तातडीने हिंदू संघटनांनी रात्री दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन निषेध केला असून कारवाईची मागणी केली आहे.त्यांनतर संस्थाचालक यांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान या प्रकरणी संस्था चालक यांचेशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला नाही.
दरम्यान घटनास्थळी तातडीने शिर्डीचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी संस्थाचालक चांगदेव कातकडे यांनी नुकताच गुन्हा क्रं.९०/२०२४ भा.द.वि.कलम २९५,३४ प्रमाणे वरील दोन आरोपी विरुद्ध दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत.
दरम्यान यात आणखी एक गुन्हा दाखल झाला असून यात संस्थेत नोकरीस असलेला फिर्यादी एक सुरक्षा रक्षक त्यांनी शहर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”दि.२६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास संत जनार्दन स्वामी रुग्णालयाच्या मैदानात आयोजित क्रिकेट स्पर्धात सामने खेळताना दोन गटात वाद झाला होता तो मिटविण्यासाठी संस्थेचे सुरक्षा रक्षक प्रज्योत राजू पवार (वय-२३) रा.दशरथवाडी ता.कोपरगाव गेलो असता वरील गुन्ह्यात असलेला आरोपी अस्लम झाकीर नदाफ (वय-२९) व त्याचा अन्य सहकारी मोबिन झाकीर नदाफ (वय-२७) रा.जयसिंगपूर आदींनी संगनमत करून त्यांच्या वैयक्तिक खोलीत प्रवेश करून शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवला व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा क्रं.८९/२०२४ भा.द.वि.कलम ४५२,५०४,५०६,३४,आर्म ऍक्ट.४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे या दोन्ही प्रकरणाचा एकमेकाशी काय संबंध आहे हे पोलिसांपुढे शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.