जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सव्वा दोन लाखांच्या गुटख्यासह दोन गुन्हे दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत  कोपरगाव तालुका पोलिसानी केलेल्या कारवाईत अनाधिकृत २.१९ लाखांचा गुटखा जप्त केला असून यातील आरोपी अश्पाक मेहबूब मणियार (वय-३०) रा.हनुमानगर कोपरगाव,वसीम चोपदार रा.दत्तनगर याचे  तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा विरुद्ध झाला असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.या प्रकरणी कोपरगाव पोलीसांचे कौतुक होत आहे.

    

दरम्यान आणखी एका कारवाईत तालुका पोलिसांनी कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत सोरट नावाचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून त्यात मॉन्टी उर्फ मनोज दिलीप मथुरे (वय-३२) रा.मुंदेलखुला ता.येवला यांचे विरुद्ध कारवाई करत त्याच्या ताब्यातील ४० हजार ५२० रुपयांचा अवैज जप्त केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा बोकाळला आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणी स्वतंत्र पथक स्थापन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक स्थापन करून संशियत जागी कारवाईसाठी रवाना केले होते.त्यांना गुप्त माहितीच्या आधारे दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास कारवाई केली असता कोपरगाव ते कोळपेवाडी रोडवर त्यांना मारुती सुझुकी (क्रं.एम.एच.०१ वाय.ए.०३४०) हि वसीम चोपदार याचे मालकीची असून त्यास अडवले व त्याची गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात २.१९ लाखांचा बेकायदा गुटखा आढळून आला आहे.

   दरम्यान या कारवाईत शिर्डी उपविभागीय पोलीस अधीकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नीं.संदीप कोळी,पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल,महेश कुसारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वांढेकर,सुरेश गागरे,पो.ना.विलास कोकाटे,अविनाश तमनर,पो.कॉ.अंबादास वाघ,पो.कॉ.अनिश शेख आदींच्या पथकाने कामगिरी बजावली आहे.

   दरम्यान या प्रकरणी  कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.दरम्यान या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.अविनाश अशोक तमनर यांनी आरोपी अश्पाक मेहबूब मणियार याचे विरुद्ध गुन्हा क्रं.४६/२०२४ भा.द.वि.कलम ३२८,१८८,२७२,३७३,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.त्याचा तपास पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तमनर हे करत आहे.त्याबाबत नागरिकांनी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

दरम्यान आणखी एका कारवाईत तालुका पोलिसांनी कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत सोरट नावाचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून त्यात मॉन्टी उर्फ मनोज दिलीप मथुरे (वय-३२) रा.मुंदेलखुला ता.येवला यांचे विरुद्ध कारवाई करत त्याच्या ताब्यातील ४० हजार ५२० रुपयांचा अवैज जप्त केला आहे.व त्याच्या विरुद्ध गुन्हा क्रं.४५/२०२४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ)प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस हे.कॉ.गजाजन वांढेकर हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close