जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गोवंश हत्येचा प्रयत्न प्रकरणी,दोघांवर गुन्हा दाखल,खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार हद्दीत अवैध रित्या गोवंश जातीची जनावरे काही असामाजिक तत्त्वांनी बाळगली असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्यास प्राप्त झाली असता त्या नुसार नूतन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केलेल्या कारवाईत खाटीकगल्ली,संजयनगर कोपरगाव येथील आरोपी जाकिर हानिफभाई कुरेशी व सांगवी भुसार येथील आरोपी दौलत त्रिंबक गायकवाड यांना २६ गोवंश जातीच्या जनावारांसह पकडले असल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

राज्यात सन-२०१४ साली भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्वाक्षरी करून गोवंश बंदी कायदा लागू केला होता.त्या कायद्यानुसार ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.मात्र त्याच्या इतकासा परिणाम कोपरगाव शहर आणि तालुक्यात दिसून येत नाही वारंवार गोवंश हत्येची प्रकरणे उघड होत आहे.सन-२०१७ साली शिवरात्रीच्या दिवशी मोठा गोवंश मांस व जनावरे आदींचा साठा संजयनगर येथे सापडला होता.

   गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते.त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍याची मागणी सात‍त्याने होत होती.१९९५ साली युती सरकारच्या काळात गोवंश हत्या बंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आले होता.राज्यात सन-२०१४ साली भाजपचे सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्वाक्षरी करून गोवंश बंदी कायदा लागू केला होता.त्या कायद्यानुसार ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.मात्र त्याच्या इतकासा परिणाम कोपरगाव शहर आणि तालुक्यात दिसून येत नाही वारंवार गोवंश हत्येची प्रकरणे उघड होत आहे.माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे काळात नगरपरिषदेच्या जवळ व पोलिसांच्या नाकाखाली संजयनगर येथे हा उद्योग ऐन शिवरात्रीच्या सुमारास सुरु असल्याचे गंभीर प्रकरण उघड झाले हॊते.सदर गुन्हा नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला होता.त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी वारंवार मागणी करूनही या घटकांवर कठोर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे हे असामाजिक तत्व चेकाळले असल्याचे दिसून येत आहे.तालुका पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी याबाबत सुरुवातीला तरी आपली चमक दाखवली असल्याचे दिसून येत असले तरी हि चमक सातत्याने दिसेल का असा सवाल निर्माण झाला आहे.मागील पोलीस निरीक्षक चमकोगिरी आणि भाषणांसाठी प्रसिद्ध होते.कृतिशून्य अधिकाऱ्यामुळे संजयनगर भागातील अनेक जण या उद्योगात असल्याचे उघड आले होते.येथील गोवंश कत्तल संगमनेर मार्गे थेट मुंबई आणि गुजरात पर्यंत धडकली होती.इतके विशाल रॅकेट असल्याचे उघड झाले होते.विशेष यात काही अधिकारी सामील असल्याचे उघड झाले होते.त्यामुळे हा गंभिर विषय असून अधिकाऱ्यांचे याबाबत कौतुक केले पाहिजे मात्र त्यांनी गुन्हेगारांच्या विरुद्ध कारवाईसाठी सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

   दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सोमवार दि.०५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३५ पूर्वी केलेल्या कारवाईत सांगवी भुसार येथील त्रिबंक गायकवाड याचे कोपीच्या कडेला काळधोंडी नदीच्या कडेला ५५ हजार किमतीची २६ गोवंश जातीची वासरे,०३ गोवंश जातीच्या गायी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिकारी कोळी,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,पो.हे.कॉ.संदीप बोटे आदींनी भेट दिली आहे.

    दरम्यान या प्रकरणी फिर्यादी पोलीस कॉ.युवराज खुळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी जाकिर कुरेशी व दौलत गायकवाड याचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा क्रं.२६/२०२४ भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ह)ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम कलम १९९५चे कलम ५(ब) ९ प्रमाणे दाखल केला आहे.

   या प्रकरणी पथकात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,पो.हे.कॉ.संदीप बोटे,पो.कॉ.जयदीप गवारे,राघू कोतकर,नवनाथ गुंजाळ,रमेश झडे,युवराज खुळे,चालक चंद्रकांत मेढे अमोल फंटांगरे आदिनीं सहभाग नोंदवला आहे.पुढील तपास पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close