जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेत,’बाल आनंद मेळावा’ उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील जिल्हा परिषद हद्दीतील शाळेत विद्यार्थ्यांचा,’बाल आनंद मेळावा‎’ मोठ्या उत्साहात घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना ‘कमवा‎ व शिका’ याची जाणीव होण्यासह‎ विविध व्यवसाय व व्यवहाराची‎ माहिती व्हावी,यासाठी हा बाल‎ आनंद मेळावा घेण्यात आला आहे.सदर ‎कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सारिका विजय थोरात या होत्या.

   शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.सदर आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी‎ विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे‎ स्टॉल लावले होते.यात पाणीपुरी,‎भेळ,पालेभाज्या,आप्पे,कचोरी,वडापाव,इडली,‎मसाला पापड,भजे,पॅटिस आदी‎ खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.

     सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,माजी सरपंच वसंत थोरात,बाबुराव थोरात,माजी उपसरपंच अण्णासाहेब भोसले,विजय थोरात,प्रकाश थोरात,कार्यकर्ते संतोष थोरात,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप सखाहारी थोरात,शाळा समितीचे सदस्य,तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव थोरात,नामदेव थोरात,अरुण थोरात,परशराम शिंदे,विजय शिंदे,मुख्याध्यापक दत्तात्रय मैड,शिक्षक श्री अंबिलवादे,निवृत्ती बढे,श्री.गोसावी.श्रीमती अंधारे,श्रीमती उगले आदींसह पालक,विद्यार्थी,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

  सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक दत्तात्रय मैड यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन नानासाहेब जवरे,माजी सरपंच थोरात यांनी केले आहे.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच सुनील थोरात यांचे हस्ते करण्यात आले आहे.उपस्थितांचे आभार निवृत्ती बढे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close