जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अपहरण प्रकरणी दोन आरोपी जेरबंद,तीन फरार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपेगाव येथील फिर्यादीने व्याजाचे पैसे न दिल्याने ते वसुलीसाठी जमीन नावांवर करून घेण्यासाठी त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी फिर्यादी शुक्लेश्वर भुजाडे (वय-५०) यांनीं विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याबाबत तालुका पोलिसांनी शरद गायकवाड,प्रतीक  उर्फ खंडू शरद गायकवाड या दोन आरोपींना अटक केली आहे तर हर्षल दत्तात्रय गवारे व दत्तू आनंदराव गायकवाड,सुनील भुजबळ,नारायण जाधव व इतर एक अनोळखी असे पाच जण मात्र फरार झाले असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे.

 

दरम्यान तालुका पोलिसानी हि कारवाई शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस हे.कॉ.लांडे,श्री वाघ,कोतकर,घनवट,राजू शेख,श्री सानप,आरवडे आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने पावले टाकली असतानाही राज्यातील बेकायदेशीर वा अवैध सावकारीला निश्चितपणे लगाम बसेल असा आशावाद सपशेल फेल ठरला असल्याचे कोपरगाव शहर आणि तालुक्यात दिसून येत असल्याचे उदाहरण नुकतेच कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे उघड झाले होते.यातील प्रमुख आरोपी शरद आनंदराव गायकवाड,त्याचा भाऊ दत्तू गायकवाड,सुनील भुजबळ,नारायण जाधव,खंडू शरद गायकवाड,व तीन अनोळखी इसमाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील फिर्यादीने व्याजाचे पैसे देऊनही त्यास मानसिक त्रास देऊन त्याचे हर्षल गवारे यांच्या सांगण्यानुसार निळ्या रंगाच्या एर्टीगा मध्ये अपहरण करून डांबून ठेवले होते.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५९४/२०२३भा.द.वि.कलम सह कलम-३६५,३२७,३४६,३४७,३४८,५०६,३४ सह सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम-३९,४५,४६ प्रमाणे आरोपी विरुद्ध  गुन्हा दाखल केला होता.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत असताना त्यांनी गंभीर दखल घेऊन यातील दोन आरोपी शरद गायकवाड,प्रतीक उर्फ खंडू शरद गायकवाड आदी  दोन जणांना अटक केली आहे तर हर्षल दत्तात्रय गवारे व दत्तू आनंदराव गायकवाड,सुनील भुजबळ,नारायण जाधव व इतर एक अनोळखी असे पाच जण मात्र फरार झाले असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे.

  दरम्यान या गुन्हयातील निळ्या रंगाची १० लाख रुपये किमतीची चेतन प्रभाकर मोरे याचे मालकीची मारुती एर्टीगा (क्रं.एम.एच.०६ बी.ई.६८९५),गुन्ह्यात वापरलेल्या प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीच्या ०२ दुचाकी (क्रं.एम.एच.१७ ए.एल.६८२८ व एम.एच.१७ ए.२४२९) असा सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहेत .मात्र या दोन दुचाकी कोणाच्या मालकीच्या आहेत हे समजू शकले नाही.

दरम्यान तालुका पोलिसानी हि कारवाई शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस हे.कॉ.लांडे,श्री वाघ,कोतकर,घनवट,राजू शेख,श्री सानप,आरवडे आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close